अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान झालेले ‘श्रीनिवासन’ – eNavakal
देश विदेश

अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान झालेले ‘श्रीनिवासन’

भारताच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान झाल्याने विदेशात भारताची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. अमेरिकेच्या न्यायालयात भारतीय वंशाचे कायदातज्ज्ञ पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्री श्रीनिवासन यांची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. श्रीनिवासन हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल महत्त्व असलेल्या फेडरल सर्किट न्यायालयाचे प्रमुखपद सांभाळणार आहेत. या पदावर कार्यरत असणारे ५२ वर्षीय श्रीनिवासन दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत.

भारतीय-अमेरिकी श्रीनिवासन

श्रीनिवासन यांचा जन्म भारताच्या चंदिगडमध्ये झाला. परंतु त्याचं मूळ गाव तामिळनाडूत आहे. त्यांच्या जन्मानंतर १९७० साली त्यांचे वडील अमेरिकेत स्थायिक झाले. अमेरिकेच्या कन्सास शहरातील लॉरेन्समध्ये श्रीनिवासन यांचं बालपण गेलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी उच्च श्रेणीतून बी.ए. ची पदवी घेतली. त्यानंतर स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून त्यांनी जे. डी. पदवी मिळवली, तर स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी एमबीए केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक नामांकित न्यायाधीशांकडे काम केलं. २०११ ते २०१३ या काळात त्यांनी अमेरिकेचे प्रिंसिपल डेप्युटी सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केलं.

श्रीनिवासन यांनी आजवर सर्वोच्च न्यायालयामध्ये २५ खटले लढवले आहेत. अमेरिकन फेडरल कोर्ट ऑफ अपील्सवरच्या न्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी श्रीनिवासन यांचं कौतुक केलं होतं. ‘श्रीनिवासन हे माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक आहेत. अमेरिकन फेडरल कोर्ट ऑफ अपील्सवर पहिल्या दक्षिण आशियाई वंशाच्या न्यायाधीशाची नियुक्ती झाली ही माझ्यासाठीही अभिमानाची बाब आहे’, असे ते म्हणाले होते.

अमेरिकेतील द्वितीय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मे २०१३ मध्ये श्रीनिवासन यांची डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (डीसी) सर्किटच्या युनायटेड स्टेट्स कोर्ट ऑफ अपील्सचे (फेडरल सर्किट न्यायालय) न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी या न्यायालयात नियुक्त झालेले ते पहिले भारतीय-अमेरिकी ठरले होते. त्यानंतर दोन वेळा त्यांचा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यासाठीही विचार झाला होता. आता अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त होऊन त्यांनी इतिहास रचला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More