अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाळदेखील उपस्थित होते. जी-२० शिखर परिषदेपूर्वी पॉम्पिओ यांनी मोदींची भेट घेतल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीपूर्वी आम्ही भारत-अमेरिका व्यापार संबंधांच्या मुद्द्यांवर अधिक भर देणार असून याबाबत सकारात्मक चर्चा करणार असल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले होते. दरम्यान, पंतप्रधानांशी चर्चेनंतर पॉम्पिओ अजित डोवाळ आणि एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे समजते आहे.

मोदी सरकार सत्तेत परतल्यानंतर भारत आणि अमेरिका संबंधांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ नंतर अमेरिकेचे मंत्री भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिका आणि इराणमध्ये अतिशय तणावपूर्ण स्थिती असल्याने भारताच्या इराणकडून तेल खरेदीबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More