अमेरिका रोखणार पाकिस्तानचा २५ कोटी ५० लाख मदतनिधी ? – eNavakal
दहशतवाद देश राजकीय

अमेरिका रोखणार पाकिस्तानचा २५ कोटी ५० लाख मदतनिधी ?

न्यूयॉर्क- अमेरिका  लवकरच पाकिस्तानला एक मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. अमेरिका सरकार पाकिस्तानला देत असलेली २५ कोटी ५०लाखाची मदत रोखण्याच्या विचारात आहे. यावरून हेच स्पष्ट होते कि पाकिस्तान त्यांच्या देशातील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत नसल्याने अमेरिका आता कठोर  पावले उचलण्यास सुरुवात करत आहे. यासंबंधीचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेले असून या वृत्तानुसार हा मदतनिधी रोखून अमेरिका पाकिस्तानला दहशतवादविरोधी कारवाई करत नसल्यामुळे यापुढे अधिक कठोर कारवाईची चेतावणी देत आहे  
या वृत्तानुसार अमेरिकेने पाकिस्तानला अराजक,हिंसा आणि दहशतवाद्यांना शरण देणारे राष्ट्र असे संबोधल्यापासून अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. २००२मध्ये पाकिस्तानला अमेरिकेकडून ३३ कोटी डॉलरहून जास्त मदत केली होती. मात्र २०१७च्या मदतनिधी संबंधी पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील. नुकतेच काबूलमध्ये अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष मायकल पेंस यांनी म्हटले होते की ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला नोटीसवर ठेवले आहे.त्यामुळे हे स्पष्ट संकेत मिळत आहेत की पाकिस्तानच्या दहशतवाद पोषक भूमिकेमुळे अमेरिका मदतनिधी रोखून धरत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More