अमेयच्या जगावेगळ्या ‘गर्लफ्रेंड’चा टीझर पाहिलात का? – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमेयच्या जगावेगळ्या ‘गर्लफ्रेंड’चा टीझर पाहिलात का?

मुंबई – पोपट, फास्टर फेणे, शटर, घंटा आणि मुरंबासह अनेक चित्रपटांतून अभिनय करणारा मराठीतील सिनेसृष्टीतील अभिनेता अमेय वाघ आता नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गर्लफ्रेंड’ असे या सिनेमाचे नाव आहे. गर्लफ्रेंड या चित्रपटाद्वारे अमेय वाघ आणि सई ताम्हणकर ही जोडी प्रथमच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अमेय नचिकेत प्रधान ही भूमिका साकारणार असून सई अलिशाची भूमिका साकारणार आहे.  या टीझरमध्ये ‘अख्या जगावेगळी अशी ही गर्लफ्रेंड!’ असे वर्णन नचिकेतने अलिशाचीबद्दल केलं आहे. या चित्रपटामध्ये सई ताम्हणकरची व्यक्तिरेखा कशी असेल याची ओळख करून दिली आहे. या टीझरमध्ये सई ताम्हणकर मस्ती करताना दिसत आहे. ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उपेंद्र सिंधये यांच्यावर आहे. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करत आहेत. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More