अमित शहांचा उद्धवजींना फोन? हिंदुत्वासाठी आमच्याबरोबर एकत्र या – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

अमित शहांचा उद्धवजींना फोन? हिंदुत्वासाठी आमच्याबरोबर एकत्र या

मुंबई – एकीकडे शिवसेनेने भाजपावर टीकास्र सोडत युतीबाबत संभ्रम निर्माण करीत तणावाचे वातावरण निर्माण केलेले असतानाच भाजपा युतीसाठी घायकुतीला आली आहे असे चित्र आहे. त्यातच आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंना फोन केला व हिंदुत्वासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी गळ घातली असे वृत्त पसरविण्यात आले आहे.

युतीचे घोंगडे फार काळ भिजत न ठेवता लवकरात लवकर युतीचा निर्णय घ्या, अशी विनंती अमित शहा यांनी केली. अमित शहांच्या फोननंतर सेना-भाजपामध्ये युतीसाठी बैठका होणार आहेत असे सांगण्यात येत आहे. शिवसेना स्वबळाची भाषा करीत आमचाच पक्ष मोठा भाऊ असल्याचा दावा करीत आहे व जागावाटपात समसमान हिस्सा मागत आहे. तर युतीसाठी आम्ही लाचार नाही, अशी वल्गना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. दोघेही पक्ष एकमेकांना आव्हान देत आपला खूंट बळकट करीत आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 15 फेब्रुवारीला जळगाव येथे जाहीर सभा घेऊन खानदेशच्या दौर्‍याची घोषणा केली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे युती होणार की नाही याचा निर्णय लवकर होण्याची गरज आहे. त्यासाठी आव्हाने आणि अफवांचा खेळ सुरू आहे.

शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या विभागवार बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 24 जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. त्याचवेळी जालन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनेला डिवचले होते. शिवसेनेशी युती झाली नाही तर आम्हाला फरक पडत नाही. आमच्यासोबत जे येतील त्यांना सोबत घेऊ व येणार नाहीत त्यांच्याशिवाय निवडणुका लढवू अशी डरकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोडली आहे. त्यानंतर आज अमित शहा यांनी शिवसेनेकडे रितसर युतीसाठी हात पुढे केला ही अफवा आहे की सत्य यावर पुढचा निर्णय ठरेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More