मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी अॅप विकसित करण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली आहे. तसंच अन्य काही मुद्दे त्यांनी यावेळी बैठकीत मांडले.
बैठकीत मांडलेले मुद्दे
- राज्यात कोरोना आणि अन्य उपचारासांठी जी रुग्णालय कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी यासाठी एक अॅप विकसित करावं.
- बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या पगारातील कपात रद्द करुन त्यांचा पगार पूर्ववत करावा.
- प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन द्यायलाच हवी.
- प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत. तसेच त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा.
दरम्यान अमित ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावू, असं आश्वासन राजेश टोपे यांनी दिलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मानधनात कपात न करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात केली होती. तर आज आरोग्य मंत्र्यांसोबतच्या भेटीत त्यांनी पुन्हा हा मुद्दा मांडला आहे.