अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत – eNavakal
मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता मुंबईच्या आझाद मैदान येथे विविध सामजिक संस्था व संघटनांमार्फत आरे वाचवा मोहिमेअंतर्गत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि चिरंजीव अमित ठाकरे हे देखील सहभागी झाले होते.

दरम्यान, अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून या वृक्षतोडीला विरोध केला होता. मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडे कापण्याचा निर्णय घेतला. बीएमसीचे अधिकारी आणि एमएमआरडीएने त्याअगोदर स्थानिकांशी चर्चा केली. 82 हजार लोकांनी याविरोधात तक्रारी केल्या. एवढ्या लोकांच्या तक्रारी असतानाही आपण झाडे कापण्याचा निर्णय घेत असू तर संशय निर्माण होणारच. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More