अमर फोटो स्टुडिओत ‘या’ अभिनेत्रीची एंट्री  – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अमर फोटो स्टुडिओत ‘या’ अभिनेत्रीची एंट्री 

मुंबई – रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नाटक ‘अमर फोटो स्टुडिओ’ला अभिनेत्री सखी गोखले हिने रामराम ठोकला आहे. नाटकातील तिची भूमिका आता अभिनेत्री पर्ण पेठे साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच सखीने ट्विटरवरून आपण नाटक सोडणार असल्याची  माहिती दिली होती. सखी उच्च शिक्षणासाठी परदेशी जात असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. या नाटकातील सखीची जागा कोण घेणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर ही जागा पर्ण पेठे घेत असल्याने प्रेक्षक तिलाही सखीप्रमाणेच पसंती देतात का हे मात्र पाहण्याजोगे असेल!

नाटकातून एक्झिट घेण्यापूर्वी सखीने व पर्ण पेठेने एकत्र छान फोटोही काढला. अमर फोटो स्टुडिओ हे नाटक सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालतेय. सुनील बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेले आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या नाटकाने  250 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More