अमरावती भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरली – eNavakal
News महाराष्ट्र

अमरावती भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरली

अमरावती-जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सादरावाडी या गावात काल रात्रीच्या सुमारास पुन्हा दुसर्‍यांदा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काल रात्री आलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या इमारतीचा काही भागातील स्लॅबही कोसळला.
15 दिवसांपूर्वीही याच गावाला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. काल या भूकंपाच्या वेळी धारणी येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे रात्रभर तळ ठोकून गावात हजर होते. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाच्या या घटनेला जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला असून किती रिस्टर स्केलचे हे धक्के होते याबाबत अध्याप अस्पष्टता आहे. दरम्यान, कालच अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यालाही भूकंपाचा जोरदार धक्का बसला. पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या घारगाव, बोरबन, कुरकुंडी, माहुली परिसर भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे हादरला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More