अमरावती – अमरावतीत वाळू माफियांनी तहसीलदार अभिजीत नाईक यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार अभिजीत नाईक यांनी सातेफळ येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकाने ट्रक सरळ तहसीलदार यांच्या गाडीवर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच नाईक हे गाडीतून उतरल्यामुळे ते थोडक्यात बचावले असून किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केले आहे. या प्रकरणात ट्रकचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.