अमरनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळून ५ ठार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

अमरनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळून ५ ठार

काश्मीर –  जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या बलाटल मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बलाटल मार्गावर रेलपत्रा आणि बरारीमार्गा दरम्यान ही दरड कोसळली. चार पुरुष आणि एका महिलेसह पाच यात्रेकरुंचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

यंदा अमरनाथची यात्रा २७ जूनला सुरू झाली. या यात्रेत देशातील २ लाख भाविक सहभागी झाले आहेत. अमरनाथला जाण्यासाठी यात्रेकरुंचा एक ताफा बलाटल मार्गे रवाना झाला. पण बलाटलला जाणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे या भाविकांना २८ जूनला बलाटल बेस कॅम्पलाच लष्कराकडून थांबवण्यात आलं होते. याच परिसरात पाऊस थोडा कमी झाल्यावर अमरनाथच्या दिशेने निघालेल्या यात्रेकरुंच्या ताफ्यावर काल दरड कोसळली. दरम्यान बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीआयडीचे निर्माते बिजेंद्र पाल सिंह ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी

पुणे – ‘फिल्म अॅँँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More