अभी नोट नही लेंगे… बस, आदमी को ही वोट देंगे’; वंचितांच्या कार्यकर्त्यांचा प्रचार – eNavakal
महाराष्ट्र

अभी नोट नही लेंगे… बस, आदमी को ही वोट देंगे’; वंचितांच्या कार्यकर्त्यांचा प्रचार

नाशिक – परचेस वोटिंग म्हणून ज्या मतदारांकडे इतके वर्ष सर्वच राजकीय पक्ष बघत होते त्या मतदारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. हा करिष्मा केलाय अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने. आंबेडकरांनी दलित मतदारांमध्ये राजकीय इच्छाशक्ती निर्माण केल्याने आणि त्यात नाशिक लोकसभेसाठी पवन पवारसारख्या चळवळीतील कार्यकत्यांला उमेदवारी दिल्याने या निवडणूकीत दलित मते मोठया प्रमाणावर वंचित आघाडीच्या पारडयात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘अभी नोट नही लेंगे, खाली आपने आदमी को वोट देंगे’ अशी सूर दलित मतदारांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

या आधीच्या निवडणूकामंध्ये दलित वस्त्यांकडे विकली जाणारी मते म्हणून उमेदवार आणि पक्षांचे पदाधिकारी बघत असे. झोपडपट्टयांमधील मते विकत घेण्यासाठी पक्षपदाधिकारी फिल्डींग लावत असे. दलित कार्यकत्याही इतर उमेदवारांच्या मागे-पुढे फिरत असे. यावेळी मात्र या चित्रात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला पाहायला मिळत आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी काढत आपण आपली ताकदी उभी करू शकतो या विषयीचा आत्मविश्वास निर्माण केल्याने दलित कार्यकत्यांमधील स्वाभिमान जागा झाला आहे. अशातच आंबेडकर यांनी पवन पवार सारख्या तगडया कार्यकत्यांला उमेदवारी दिल्याने अब आपना आदमी भी खासदार बन सकता है असा विश्वास दलित मतदारांच्या मनात निर्माण झाला आहे. यातूनच अब नोट नही लेंगे, बस्स आदमी को ही वोट देंगे, असा सूर मतदारांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More