अभिषेक बॅनर्जींनी पंतप्रधानांना बजावली मानहानीची नोटीस – eNavakal
News देश

अभिषेक बॅनर्जींनी पंतप्रधानांना बजावली मानहानीची नोटीस

कोलकाता- तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानहानीची नोटीस पाठविली आहे.
पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर येथे 15 मे रोजी झालेल्या प्रचार सभेत मोदींनी आपल्याबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली असल्याचा आरोप करत अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या वकिलामार्फत ही नोटीस पाठविली. मोदींनी केलेल्या वक्तव्यावर 36 तासांत माफी मागावी, असेही त्यांनी या नोटीसीत म्हटले आहे. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर येथील खासदार आहेत. मोदींनी प्रचार सभेत ममता- अभिषेक यांनी बंगालला बदनाम केले. हिंसाचार पसरवण्यासाठी यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी आपल्या भाषणात गुंड शब्दाचाही वापर केला. अशी वक्तव्ये करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, असे नोटिशीत अभिषेक यांनी नमूद केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More