अभिषेक कदमने जिंकली कॅरम स्पर्धा – eNavakal
क्रीडा मुंबई

अभिषेक कदमने जिंकली कॅरम स्पर्धा

मुंबई- राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने आयोजित करण्यात आलेली कामगार महर्षी स्व. गं. द. आंबेकर स्मृती चषक आंतर गिरणी कामगार एकेरी कॅरम स्पर्धा टाटा मिलच्या अभिषेक कदमने जिंकली. अभिषेक कदमने चुरशीच्या अंतिम सामन्यात पोद्दार मिलच्या विशाल सागवेकरचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणून अजिंक्यपदाला गवसणी घातली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने प्रदीर्घ कालावधीनंतर गिरणी कामगारांची कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ सभागृहामधील आंबेकर चषक कॅरम स्पर्धेचा अभिषेक कदम विरुद्ध विशाल सागवेकर यामधील अंतिम सामना रंगतदार झाला. दोघांनी अप्रतिम खेळ करून पहिल्या दोन गेममध्ये 1-1 अशी बरोबरी केली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये मात्र अभिषेक कदमने अचूक खेळ करीत राणीवर कब्जा मिळविण्याचे सातत्य राखले आणि प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणत 25-1, 22-25, 25-4 अशी बाजी मारली. स्पर्धेतील उपांत्य उपविजेतेपद राजेश कोचरेकर व विनायक शिंदे यांनी तर उपांत्यपूर्व विजेतेपद अक्षय मांजरेकर, रुपेश कोळंबकर, दत्ताराम साळसकर व विलास काळे यांनी मिळविले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More