अभियंत्याच्या घरी पालघर नगर परिषदेचे कागदपत्र – eNavakal
महाराष्ट्र

अभियंत्याच्या घरी पालघर नगर परिषदेचे कागदपत्र

पालघर – पालघर नगर परिषदेचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. या नगर परिषदेकडे बांधकाम परवानगीसाठी दाखल झालेली शेकडो प्रकरणे आणि त्यांची कागदपत्रे बदली झालेल्या एका अभियंत्याच्या घरात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अभियंत्याच्या घरी ठेकेदार, विकासक, वास्तुविशारद बांधकाम परवानग्या घेण्यासाठी उपस्थित असताना त्यांना काही नगरसेवकांनी रंगेहाथ पकडल्याने हा कारभार उघडकीस आला. भालचंद्र क्षीरसागर असे या अभियंत्याचे नाव असून तो आपल्या कार्यकाळातील तारखांनुसार संबंधित बांधकाम प्रकरणे हाताळत असल्याचे समजले. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पालघर मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी म्हटले आहे.

क्षीरसागर यांची तीन महिन्यांपूर्वी इतरत्र बदली झाल्यानंतरही ते अधूनमधून पालघरमध्ये येत असत. पालघर नगरपरिषदेच्या हद्दीबाहेर माहीम ग्रामपंचायतीमध्ये ‘कांचन पारिजात’ नावाची इमारत आहे. या इमारतीतील एक घर नगर परिषदेत पूर्वी कार्यरत असलेले अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या या घरात नगर परिषदेच्या शेकडो फाईल, महत्त्वाचे दस्तावेज, शिक्के आणि तेथील संगणकामध्ये महत्त्वपूर्ण माहिती असून क्षीरसागर जुन्या प्रकरणांना त्यांच्या कार्यकाळातील तारीख टाकून परवानगी देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते भावानंद संखे, नगरसेवक अमोल पाटील, अरुण माने हे गुरुवारी सायंकाळी अचानक त्यांच्या घरी आले. त्यावेळी तिथे काही वास्तुविशारद, विकासक आणि ठेकेदार आपल्या प्रलंबित प्रकरणांविषयी चर्चा करत असल्याचे त्यांना आढळले. तसेच पालघर शहरातील गेल्या तीन-चार वर्षांतील महत्त्वाच्या बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे आणि जून २०१९ मधील बांधकाम परवानगीसंदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तावेजही तेथे आढळले. यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणांचा समावेश असून काही गहाळ केलेली कागदपत्रे आणि फायलीही सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

पालघर नगर परिषदेच्या कार्यालयात मुबलक जागा असताना विकासकांची अडवणूक करून पैसे उकलण्याच्या हेतूने महत्त्वपूर्ण दस्तावेज कार्यालयाबाहेर नेण्यात आल्याचा आरोप नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी केला आहे. तर हा कारभार बदली झालेला अभियंता, मुख्याधिकारी आणि काही नगरसेवकांच्या संगनमताने केला जात असल्याचे आरोपही होत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More