अभिनेते आनंद अभ्यंकरांच्या वारसांना मिळणार 72 लाख रुपयांची नुकसान भरपाई – eNavakal
अपघात न्यायालय महाराष्ट्र

अभिनेते आनंद अभ्यंकरांच्या वारसांना मिळणार 72 लाख रुपयांची नुकसान भरपाई

पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात निधन पावलेले लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकरयांच्या कुटुंबीयांना लोक न्यायालयाने आज ७२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली. आज शिवाजीनगर कोर्टात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतमध्ये हे प्रकरण निकाली काढण्यात आले. या प्रकरणी अभ्यंकर कुटुंबीयांनी १ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा केला होता.

अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्यासह अभिनेता अक्षय पेंडसे यांचे २३ डिसेंबर २०१२मध्ये अपघाती निधन झाले होते. उर्से टोलनाक्यानजिक बऊर गावाजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनआर गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला होता. यात आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, त्यांची पत्नी दीप्ती आणि मुलगा गंभीर जखमी झाले. त्यांना निगडीमधील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अभ्यंकर, पेंडसे आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात पेंडसे यांची पत्नी दीप्ती आणि अभ्यंकर यांचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले होते.

आनंद अभ्यंकर हे मोठ्या तसेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार होते. ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘मला सासू हवी’, या मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. तसेच, ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘मातीच्या चुली’, ‘स्पंदन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More