अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कारला अपघात! रॅश ड्राइव्हिंगचा गुन्हा दाखल – eNavakal
News गुन्हे

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कारला अपघात! रॅश ड्राइव्हिंगचा गुन्हा दाखल

मुंबई- ओशिवरा पोलीस ठाण्याच्या समोरच्या रोडवर बालिका वधू आणि दिल से दिल तक या हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कारला आज सायंकाळी अपघात झाला. अपघातात तीन अन्य चारचाकी गाड्यांचेही नुकसान झाले असून सिद्धार्थची बीएमडब्ल्यू कार अपघातात डिव्हायडरवर चढली. या अपघातादरम्यान श्रीजी जंक्शन ते मेघा लिंक रोडवरील वाहतूक थोड्यावेळासाठी बंद करण्यात आली होती. या अपघातात सिद्धार्थ किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आले होते. याप्रकरणी बेजबाबदारपणे भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे ओशिवरा पोलीस ठाण्यात सिद्धार्थ शुक्लाविरोधात भा. दं. वि. कलम 279 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More