अभिनेता चिरंजिवीच्या घरात झाली दोन लाखांची चोरी, चोराने दिली 16 लाख चोरल्याची कबुली – eNavakal
गुन्हे देश मनोरंजन

अभिनेता चिरंजिवीच्या घरात झाली दोन लाखांची चोरी, चोराने दिली 16 लाख चोरल्याची कबुली

हैद्राबाद – साउथ सुपरस्टार चिरंजिवी याच्या घरात काही दिवसांपूर्वीच दोन लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी याप्रकरणाचा उलगडा झाला असून, आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे चिरंजिवीचा नोकर चेन्नैया याला अटक केली आहे. परंतु धक्कादायक बाब तेव्हा समोर आली जेव्हा नोकराने मी दोन नव्हे तर गेल्या काही महिन्यात तब्बल 16 लाख रुपये चिरंजिवीच्या घरातून चोरल्याची कबुली दिली.
चेन्नैया गेल्या दहा वर्षांपासून चिरंजिवीच्या घरी नोकर म्हणून काम करतो. सध्या चेन्नैयाचे वय 28 असून, तो गेल्या 18 वर्षांपासून चिरंजिवीच्या घरी काम करीत असल्याने तो सर्वाधिक विश्वासू नोकर समजला जातो. त्याचबरोबर चेन्नैयाला घरातील कुठली वस्तू कुठे ठेवली जाते याची इत्यंभूत माहिती असल्याने पैशाचा ठावठिकाणा तो जाणून होता. मात्र जुना आणि विश्वासू असल्याने त्याच्यावर कोणीही संशय घेत नव्हते. याचाच फायदा घेऊन चेन्नैया घरात हात साफ करू लागला.
सुरुवातीला त्याने थोडी-थोडी रक्कम चोरण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही. परंतु जेव्हा त्याने तब्बल दोन लाख रुपये चोरले तेव्हा त्याच्यावर सर्वांचाच संशय गेला. पुढे हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. जेव्हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हाच पोलिसांचा चेन्नैयावर संशय गेला. त्याला तपासासाठी ताब्यात घेतले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दोन नव्हे तर 16 लाख रुपये चोरल्याची कबुली दिली. आरोपी चेन्नैयाकडून चोरलेली रक्कम हस्तगत करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर केले आहे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

नोएडातील रस्त्यांवर निमलष्करी दल तैनात

नोएडा – सर्व जिल्ह्यांच्या आणि राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशचे गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या....
Read More
post-image
अर्थ विदेश

येत्या काही दिवसांत वर्जिन अटलांटिक मागणार सरकारकडे मदत

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जगभरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही या विषाणूमुळे देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच ब्रिटनची वर्जिन अटलांटिक...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

ऐका, शरद पवारांचा लाईव्ह संवाद

मुंबई – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये वीज अंगावर पडून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ – देशावर कोरोना व्हायरसचे संकट असतानाच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात कोरोना संशयिताचा मृत्यू? अहवालाची प्रतीक्षा

कोल्हापूर – राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आज कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे...
Read More