‘अब की बार ट्रम्प सरकार’! खुद्द मोदींकडून ट्रम्प यांचा प्रचार – eNavakal
News विदेश

‘अब की बार ट्रम्प सरकार’! खुद्द मोदींकडून ट्रम्प यांचा प्रचार

ह्युस्टन-  भारताच्या आतापयर्र्ंतच्या कुठच्याही पंतप्रधानांचे अमेरिकेत झाले नव्हते एवढे स्वागत आज ह्युस्टनमध्ये मोदींचे झाले. 60 हजार भारतीय, 60 अमेरिकेचे खासदार आणि नेते, ह्युस्टनचे महापौर, टेक्सासचे गव्हर्नर हे सर्व जण ‘मोदी मोदी’ असा जयघोष केला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना कडकडून मीठी मारली. तर मोदींनी अमेरिकेच्या पुढील वर्षाची राष्ट्रपतींची निवडणुक लक्षात घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचा नारळच फोडला. ‘अब की बार ट्रम्प सरकार’, अशी घोषणाच खुद्द मोदी यांनी केली. तर मोदी हे अमेरिकेचे एकनिष्ठ मित्र असल्याची तारिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तसेच मुस्लीम कट्टर पंथीयांविरुद्ध एकत्रीत लढू अशी घोषणाही केली. यावेळी सुखावलेल्या 60 हजार भारतीयांनी टाळ्यांचा कडकडाट आणि मोदी, मोदी व युएसए, युएसए असा जयघोष केला.
अमेरिकेच्या खासदारांनी भारताच्या पंतप्रधानांचा उभे राहून जयघोष करण्याची आजची ही पहिलीच वेळ होती. आज मोदींनी अमेरिका जिंकली. तर मोदींच्या या मेळाव्याला हजर राहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील 45 लाख भारतीयांची मने आणि मते जिंकली. 2020 साली डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. ह्यूस्टन व टेक्सास सहीत संपुर्ण अमेरिकेत 45 लाख भारतीय मतदार आहेत. त्यांची मते जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या लोकशाहीचे आणि भारताला प्रगती पथावर नेण्यासाठी झटणार्‍या मोदी यांचे कौतुक केले. तसेच मोदींनी दुसर्‍यांदा बहुमताने लोकसभा निवडणुक जिंकल्याबद्दल मोदींचे ट्रम्प यांनी अभिनंदन केले. तसेच अमेरिकेत राहणार्‍या लाखो भारतीयांचे संरक्षण करणे ही अमेरिकेची जबाबदारी असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. तसेच दहशतवाद विरोधी लढ्यात अमेरिका भारताच्या सोबत असून, भारत-अमेरिकेसाठी सीमेची सुरक्षा करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे.
मोदींनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्वोच्च नेते असून जगाच्या राजकारणात त्यांचा शब्द आणि स्थान अढळ आहे. या पृथ्वीवर राहणार्‍या प्रत्येकाला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माहित आहे. जगाच्या राजकारणाला वळण देण्याचे काम ट्रम्प करत आहेत. जगाच्या राजकारणावर, संरक्षणावर आणि आर्थिक घडामोडींवर ट्रम्प यांनी आपली अमिट छाप सोडली आहे. मला प्रत्येक वेळी त्यांच्याकडून प्रेम, माया आणि उब मिळते. आजचा प्रसंग हा ऐतिहासिक आहे. ट्रम्प यांचा अमेरिकेला बलशाली व महासत्ता बनविण्याचा निर्धार आहे. भारताचा खरा मित्र व्हाईट हाऊसमध्येच आहे. ट्रम्प यांनी भारत-अमेरिका मैत्री अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवली आहे. भारताच्या प्रेमाखातरच ते आजच्या कार्यक्रमाला आवर्जुन हजर राहिले. म्हणूनच ‘अब की बार ट्रम्प सरकार’.
भारतीय वेळेनुसार आज रात्री 9.39 वाजता पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे एनआरजी स्टेडियममध्ये आगमन झाले. मोदींचे आगमन होताच अमेरिकेतील भारतीयांनी उभे राहुन त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीयांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले. मोदींनीही व्यासपीठावर जाऊन उपस्थितांना लवून नमस्कार केला. यावेळी ह्युस्टनचे महापौर सोफेस्टन यांनी ‘की ऑफ ह्युस्टन’ची प्रतिकृती भेट देऊन मोदींचा सन्मान केला. यावेळी अमेरिकेचे प्रतिनिधी स्टेनी हॉयर यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका हे ब्रिटीशांच्या वसाहतवादातून निर्माण झाले. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्याची किंमत माहित आहे. त्यामुळे दोन्ही देशांत लोकशाही प्रगत आणि मजबूत आहे. खोलवर रुजलेली आहे. या कार्यक्रमात भारतीयांसह अमेरिकी गायकांकडून महात्मा गांधी यांना 150 व्या जन्म वर्षानिमित्त ‘वैष्णव जन तोहे’ या भजनातून श्रध्दांजली वाहण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जशी दोस्ती आहे तसे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेदही आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अमेरिकेत लावलेल्या अव्वाच्या सव्वा करांमुळे भारताच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेच्या ट्रेड अ‍ॅन्ड टेरिफ धोरणामुळे दोन्ही देशांत मतभेद आहेत. भारताने रशियाकडून शस्त्रे खरेदी केल्यामुळे अमेरिका नाराज आहे. तरीही या सर्व मतभेदांवर मात करून डोनाल्ड ट्रम्प हे या कार्यक्रमाला आले. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना 2020 च्या निवडणुकीत अमेरिकेतील 45 लाख भारतीयांची मते हवी आहेत. म्हणून ते मोदींच्या या मेळाव्याला आवर्जुन हजर राहिले. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भेटीचा फायदा पाकिस्तानवर राजकीय दबाव आणण्यासाठी करून घेतला. आजच्या मोदींच्या ह्यूस्टनच्या मेळाव्याला अमेरिकेच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रेटीक पार्टीचे 60 खासदार अनेक गव्हर्नर, उद्योगपती व विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. अमेरिकेत राहणार्‍या भारतीय समाजाने अमेरिकेतील कुठचाही राजकीय पक्ष दुखावला जाऊ नये म्हणून सर्वांनाच आमंत्रित केले होते. भारतीयांनी सांगितले की, आमची मातृभूमी भारत असली तरी कार्यभूमी अमेरिकाच आहे. अमेरिकन जनतेच्या मनात आमच्या वागणुकीने कुठचाही संशय निर्माण होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत.
शनिवारी नरेेंद्र मोदी हे ह्यूस्टनच्या जॉर्ज बुश आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. तेथे त्यांचे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार खात्याचे प्रमुख ख्रिस्तोपर ओल्सन आणि अनेक बड्या अधिकार्‍यांनी स्वागत केले. त्यानंतर मोदी यांनी अमेरिकेतील बोहरी मुस्लिम, शीख व काश्मिरी पंडित समाजाशी दिलखुलास चर्चा केली. यासर्वांनी नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. ह्यूस्टनला ‘एनर्जी सिटी’ म्हटले जाते. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील तेल, गॅस आणि उर्जा क्षेत्रातील 17 प्रमुखांशी वाटाघाटी केल्या. अनेक कंपन्यांनी भारताला एलएनजी गॅस पुरवण्याचे करारही केले.
तत्पूर्वी ह्यूस्टनच्या भव्य एनआरजी फुटबॉल स्टेडियमवर भारतीय संस्कृतीचे आणि कलेचे दर्शन घडविणारा नव्वद मिनिटांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. शिखांच्या शबद किर्तनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भरतनाट्यम, कुच्चीपुडी, मनीपुरी, कथ्थक अशा विविध प्रांतांच्या नृत्य प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. दांडिया गरबांपासून पंजाबी भांगड्यापर्यंत आणि शास्त्रीय गायणापासून इंग्रजी, हिंदी पॉप गाण्यांचे व नृत्यांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमांत 400 कलाकारांनी सहभाग घेतला. हे कार्यक्रम 27 सांस्कृतिक संस्थांनी सादर केले. हा रंगारंग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमेरिकेतील 650 अनिवासी भारतीयांच्या गटांनी एकत्र येऊन या सांस्कृतिक विविधतेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गेले महिनाभर या कार्यक्रमांची रंगीत तालीम सुरु होती. अमेरिकेमध्ये 27 हजार भारतीय डॉक्टर्स आणि विविध क्षेत्रातील अग्रणी लोकांनी या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ दिले. फटाक्यांच्या आतिषबाजीने संपुर्ण स्टेडियम दणदणून गेले होते. तर विद्युत रोषणाईने सगळा ह्युस्टन उजळला होता. मोदींचा हा ह्यूस्टनमधील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे गुजरात व इतर राज्यातील 120 आमदार ह्यूस्टनमध्ये 15 दिवसांपासून तळ ठोकून होते.
कार्यक्रमाच्या आधीपासूनच एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये 60 हजार लोक जथ्याजथ्याने आले. काही लोक दुरच्या शहरातून खास 140 बसेसने स्टेडियमवर पोहोचले. 5 हजार लोक वेटींगलिस्टवर होते. हजारो लोक बाहेर ताटकळत होते. त्यांच्यासाठी स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या. सर्व भारतीय सहकुटुंब हातात कागदाचे तिरंगे झेंडे घेऊन स्टेडियमवर येत होते. स्टेडियमध्ये ‘हर हर मोदी’चा जयघोष उपस्थितांकडून करण्यात येत होता. आजचा मोदींचा कार्यक्रम हा 2014 मधील न्युयॉर्कच्या मेडिसम स्क्वेअर व 2016 ला सिलीकॉन व्हॅली येथे झालेल्या भारतीयांच्या मेळाव्यापेक्षा कित्येक पटीने भव्य आणि दिव्य होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More