जलालाबाद – अफगाणिस्तानमधील नांगरहारची राजधानी जलालाबादमध्ये रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात संसदीय आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील एकमेव शीख उमेदवार अवतार सिंह यांचाही मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून अफगाणिस्तान येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.
मृतांमध्ये हिंदू आणि शिखांची संख्या जास्त असून हा हल्ला हिंदू आणि शिखांना टार्गेट करण्यासाठीच करण्यासाठी करण्यात आला असल्याचे वृत्त समोर येत आहे. मृतांमध्ये १७ शीख आणि हिंदूंचा समावेश असल्याची माहिती आरोग्य संचालक नजबुल्लाह यांनी दिली आहे. तर या हल्ल्यात एकूण २० जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी या ठिकाणी दौऱ्यावर होते. राष्ट्राध्यक्षांचा दौरा असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आली होती. अन्यथा मृतांचा आकडा अजून वाढला असता.