अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे नाशकात महिलांचा महापालिकेवर मोर्चा – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे नाशकात महिलांचा महापालिकेवर मोर्चा

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून दोन दिवसांपासून पाणीच येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज सकाळी मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी दालनात अधिकाऱ्यांना डांबून ठेवत कार्यालयाला टाळे ठोकले. यामुळे मनपा कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सिडकोवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सुवर्णा मटाले यांनी केला आहे.
सिडकोतील जाधव संकुल, मयुर हॉस्पिटल परिसर, सिद्धटेकनगर, विशालपार्क, विखे पाटील नगर परिसर, वृंदावन नगर, डिजीपीनगर या भागातील पाणी पुरवठा गेल्या काही दिवंसापासून विस्कळीत झालेला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात मनपा विरोधात असंतोष आहे. अशातच दोन दिवसांपासून पाणीच न आल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आज नगरसेविका सुवर्ण मटाले यांनी माहिलांना घेत सिडकोतील मनपा कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने महिला आंदोलक संतप्त झाल्या. मनपाने अतिरिक्त बंदोबस्त मागविताच मटाले आक्रमक झाल्या. त्यांनी थेट विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना डांबून या दालनाला टाळे ठोकले. आठ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करून देण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन थांबविण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More