(अपडेट) #KisanKrantiYatra पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार; ३० शेतकरी जखमी – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन देश

(अपडेट) #KisanKrantiYatra पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार; ३० शेतकरी जखमी

नवी दिल्ली – भारतीय किसान युनिअनने (बीकेयू) पुकारलेली ‘किसान क्रांती पदयात्रा’ आज दिल्ली-उत्तरप्रदेशच्या सीमेवर पोहोचली आहे. या पदयात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकरी राजधानी दिल्लीत दाखल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीत १४४ जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे.

दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांसोबत आरपीएफ, पॅरामिलिटरी फोर्स तैनात करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार मारा केला. शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर करण्यात येत आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यात काही आंदोलक रक्तबंबाळ झाले असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत वातावरण तापले आहे.

२३ सप्टेंबरपासून उत्तराखंड येथून केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात किसान क्रांती पदयात्रा काढण्यात आली आहे. त्याची सांगता आज दिल्लीत होणार आहे. या पदयात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. मात्र ही पदयात्रा रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. ही पदयात्रा दिल्लीच्या वेशीवरती रोखण्यात आली आहे. पोलिसांनी मोर्चकऱ्यांना थांबवण्यासाठी दिल्ली-मेरठ महामार्गावरील गाजीपूर सीमेवरील अनेक रस्ते बंद केले आहेत. या महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत. या सर्व परिस्थितीवर दिल्ली पोलीस लक्ष ठेवून आहेत.

आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांच्या मागण्या 

60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे, पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करण्यात यावा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर देय रक्कम द्यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, किसान क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त कर्ज मिळावे, भटक्या जनावरांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी व्यवस्था करावी, सर्व पिकांची पूर्णपणे खरेदी व्हावी, स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारण्यात यावा, उसाची देय रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास त्यावर व्याज मिळावे या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

इलेक्ट्रिक बस करार रद्द! बेस्टला हायकोर्टाचा दणका

मुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...
Read More
post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More