(अपडेट १) गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला लाईट घालवली तर मनसे स्टाईलने अधिकाऱ्यांना तुडवा – राज ठाकरे – eNavakal
उपक्रम मुंबई राजकीय

(अपडेट १) गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला लाईट घालवली तर मनसे स्टाईलने अधिकाऱ्यांना तुडवा – राज ठाकरे

मुंबई – आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १२ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी राज ठाकरे विरोधकांना चांगले धारेवर धरले आहे. मला जे काही बोलायचं गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलेल तसेच कार्यक्रमाच्या वेळी लाईट घालवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसे स्टाईलने तुडवा असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १२ वा वर्धापन दिन शुक्रवार ९ मार्च रोजी रंगशारदा हॉल, वांद्रे येथे राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी राज ठाकरे बोलत होते.

सदर वर्धापन दिनाला ‘आम्ही आणि आमचे बाप’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या नाटकात अतुल परचुरे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अमित परब  यांनी या कार्यक्रमात रंगत आणली. तसेच स्नेहल जाधव यांनी तयार केलेल्या राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांच्या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र दर्शन यांच्या पुस्तकांचे देखील प्रकाशन केले, माथाडी कामगार सेने तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही निधी देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 व्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली याद्वारे पक्षाच्या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतील असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपासारखे आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का? असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More