(अपडेट 4) कॉंग्रेसला अपयशाचा राग – देवेंद्र फडणवीसांची टीका – eNavakal
आंदोलन देश मुंबई

(अपडेट 4) कॉंग्रेसला अपयशाचा राग – देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई – संसदेचे अधिवेशन वाया घालवल्याच्या निषेधार्थ विरोधकांविरोधात भाजपचे एकदिवसीय उपोषण सुरू आहे. या उपोषणमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपोषणाला बसले आहेत. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, काँग्रेस पक्ष देशात येणाऱ्या निवडणुकीचे अपयशाचे खापर संसदेत कामकाज बंद पाडत तिथे फोडत आहे. देश प्रगतीपथावर चालत असताना काँग्रेसने या प्रगतीपथाच्यामध्ये येत आहे. देशातील निवडणुकांमध्ये वारंवार येणाऱ्या अपयशामुळे काँग्रेसमध्ये राग निर्माण झाला आहे. हा राग जनतेवर काढता येत नसल्यामुळे काँग्रेसने एक नवीन प्रगात सुरु केला असून यात संसदमध्ये पंतप्रधान बोलायला उठले की, गोंधळ घालायचा आणि संसदेचे कामकाज बंद पाडायचे, असे आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना म्हटले आहे.

फडणवीस पुढे बोलताना म्हटले, खोटे बोला पण रेटून बोला असे सध्या काहीतरी काँग्रेस पक्षाचे काम सुरु आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना काय बोलायचे ते संसदमध्ये बोलावे, बाहेर बोलण्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिले नसल्याचे फडणवीस यांनी मुंबईतील उपोषणस्थळी बोलताना म्हटले आहे.

कर्नाटकमधील धारवाडमध्ये भाजपा अमित शहा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुंबईत उपोषण सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांसहीत आशिष शेलार, पूनम महाजन, आणि परेश रावल सुद्धा उपोषणात सामील झाले आहेत. महाराष्ट्रात पुण्याच्या बालगंधर्व चौकात खासदार काकडे यांचे उपोषण सुरु आहे. ठाण्यात कोर्टनाका येथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात गुलमंडी येथे उपोषण सुरू झाले आहे. दिल्लीच्या चांदणी चौक येथे डॉ. हर्षवर्धन यांचे उपोषण सुरु झाले आहे. या ठिकाणी तंबू, पंखे अशी चांगली सोय केली आहे.

दरम्यान, उपोषणाला केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्व सदस्य देखील बसले असून यात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल ठाणे कोर्ट नका येथे उपोषणाला बसले आहे. यामध्ये माध्यमांनी त्यांना उपोषण संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. पियुष गोयल यांनी म्हटले की, काँग्रेस पक्षाला भारताच्या परंपरेशी आणि देशाच्या संविधानाशी काहीही देणे घेणे नाही. तसेच आर्थिक परिस्थितीशी देखील काँग्रेस पक्ष घेणे नसल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे.

दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी देखील काँग्रेस पक्षावर चांगलीच टीकेची झोड उडवली आहे. तिवारी यांनी म्हटले की, जेव्हा पंतप्रधान संसदेत बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा काँग्रेसचे मूठभर खासदार मुद्दाम गोंधळ घालून कामकाज बंद पाडतात. आमचे उपोषण करण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांना खरे समजावे की, काँग्रेस किती चुकीचे वागत आहे. त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर यावा यासाठी भाजप उपोषण करत असल्याचे म्हटले आहे.

भाजप खासदार परेश रावल यांची प्रतिक्रिया 

भाजप खासदार परेश रावल यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी राहुल गांधी यांच्या उपोषणावर तोंडसुख घेत, चांगलीच टीका केली आहे. परेश रावल यांनी म्हटले की, काँग्रेसने केलेला उपवास हा उपवास नसून उपहास आहे. छोले भटुरे खाऊन त्यांनी लोकांच्या भावना दुखल्या आहे. आम्ही काँग्रेस प्रमाणे तोडफोडीचे आंदोलन न करत शांततेत आंदोलन उपोषण करत असल्याचे रावल यांनी बोलताना म्हटले.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More