(अपडेट) मोटरमन संघटनांची रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन सुरूच – eNavakal
मुंबई

(अपडेट) मोटरमन संघटनांची रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन सुरूच

मुंबई – मध्य रेल्वेवरील मोटरमन्सनी वेगवेगळ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आजपासून ओव्हरटाईम न करण्याचा इशारा दिला आहे. मोटरमन संघटना आणि रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मोटरमन्सने ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्याने आज सकाळपासूनच मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु होती. ९ लोकलफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मोटरमन्सचे हे आंदोलनामुळे मध्यरेल्वेसह हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची भीती आहे.  मोटरमन संघटनांची प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली असून लेखी आश्वासन देईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकार जोवर लेखी आश्वासन देत नाही तोवर मोटरमन संघटनेचा हा संप तूर्तास निवळण्याची शक्यता दिसत नाही

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

राज्यसभेतील जागा बदलल्याने संजय राऊतांचे सभापतींना पत्र

नवी दिल्ली – राज्यसभेतील जागा बदलल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

फडणवीस आणखी ३ महिने ‘वर्षा’ बंगल्यातच राहणार

मुंबई – राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राज्याची सर्व सूत्रे राज्यपालांकडे गेली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या माजी मंत्र्यांनी राहते बंगले सोडण्याची तयारी सुरू केली आहे....
Read More
post-image
देश

देशभरात एनआरसी लागू करण्यात येईल – अमित शहा

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) बाबत विरोधी पक्षांकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशभरात एनआरसी लागू करण्यात येईल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

२५ नोव्हेंबरपर्यंत महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडेल – सत्तार

मुंबई – २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडेल,  असा दावा शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केला आहे.  ‘राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

पवारांच्या भेटीनंतर मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावले

नवी दिल्ली – महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी...
Read More