अपडेट : खराब आंब्याच्या १० दिवसांपूर्वीच्या हाणामारीतून औरंगाबाद पेटले! धार्मिक दंगलीचा भडका! – eNavakal
News महाराष्ट्र

अपडेट : खराब आंब्याच्या १० दिवसांपूर्वीच्या हाणामारीतून औरंगाबाद पेटले! धार्मिक दंगलीचा भडका!

औरंगाबाद – आठ दिवसांपूर्वी आंबे खरेदीवरून उन्मेष हुलिए या तरुणाला मारहाण झाल्यावरून निर्माण झालेला तणाव काल रात्री मोतीकारंजा भागात उफाळून आला. त्यानंतर उसळलेल्या धार्मिक गटांतील दंगलीत औरंगाबाद शहर होरपळले. या दंगलीने दोघांचा जीव घेतला. 100 दुकानं भस्मसात झाली. शेकडो गाड्या जाळल्या गेल्या. पोलीस बंदोबस्तामुळे शहरात दुपारी शांतता पसरली असली तरी या तणावाच केव्हाही स्फोट होईल, अशी भीती आहे.

औरंगाबाद सारख्या संवेदनशील शहराला यशस्वी यादव यांच्यानंतर गेले तीन महिने पोलीस आयुक्त दिलेला नाही याचेही परिणाम नागरिकांना भोगावे लागले. या दंगलीत ज्या भागातील दुकाने पेटवली त्या शहागंज, मोतीकारंजा राजा बाजार, गांधी पुतळा, गुलमंडी भागात अद्याप पूर्ण शांतता नाही. पोलिसांनी परिस्थिती ओळखून या भागातील इंटरनेट सेवा बंद करून 144 कलमाने जमावबंदी लागू केली आहे. आठ दिवसांपूर्वी शहागंज भागात उन्मेष हुलिए या राजाबाजार येथे राहणार्‍या तरुणाने एकाकडून आंबे विकत घेतले. ते आंबे खराब निघाल्याने तो हे आंबे परत करण्यास गेला तेव्हा व्यापार्‍याने ते आंबे फेकून देऊन उन्मेषला मारहाण केली. या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केल्यावरही राग धुमसत होता.
त्यातच काल दुपारी मोतीकारंजा भागात पालिकेने अनधिकृत स्टॉल, नळ जोडण्या यावर मोठी कारवाई केली. रमझानच्या पवित्र महिन्यात या भागात विविध गोष्टी विकणार्‍या हातगाड्या, स्टॉल्स लावले जातात. ही कारवाई झाल्याने पुन्हा माथी भडकली आणि रात्री शहागंज, राजाबाजार, गांधीपुतळा, गुलमंडी भागातील दुकाने, वाहने समाजकंटकांनी जाळली. यानंतर मात्र दोन गटांत तुफान हाणामारी, दगडफेक सुरू झाली.
दंगलसदृश्य परिस्थिती
जुन्या भांडणाच्या वादातून दोन गटांमध्ये मोतीकारंजा येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तलवार, लाठ्याकाठ्यांनी हाणामारी सुरु झाली. त्यानंतर तुफान दगडफेक जमावाकडून करण्यात येत होती. यावेळी जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून वाहने फोडली. घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक, स्ट्रायकींग फोर्सचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मोतीकारंजा येथील दगडफेकीचे लोण शहागंज, राजाबाजार, अंगुरीबाग, पानदरीबाग आदी भागात पसरल्यावर समाजकंटकांनी दिसेल त्या वाहनावर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. तसेच अनेक दुचाकी व चारचाकी वाहने पेट्रोल टाकून पेटवून दिली. या घटनेमुळे शहरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
दोन जणांच्या मृत्यूमुळे तणाव वाढला
शहागंज परिसरातील एका दुकानात जगनलाल छगनलाल बन्सीले (62) हे काल झोपले होते. समाजकंटकांनी पेट्रोल ओतून दुकानाला पेटवून दिल्यावर पॅरालिसिसने आजारी असलेले जगनलाल यांना दुकानाच्या बाहेर पडता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
तर अब्दुल हरीश अब्दुल हारून कादरी (17) हा युवक जिन्सीत झालेल्या दगडफेकीत जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दंगलीत रात्रीपासून 40 जखमी उपचारासाठी घाटी रूगेणालयात दाखल झाले होते. शेख महेब हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात येत आहेत.
सहाय्यक आयुक्त, निरीक्षक जखमी
दगडफेकीदरम्यान सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या घशावर दगडाचा फटका बसल्याने ते जखमी झालेत. त्यांना दर्गा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच रामेश्वर थोरात आणि पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी जखमी झाले.
शहरातील इतर भागात शांतता हिंसक प्रकारानंतर शहरातील शहागंज, मोतीकारंजा आणि इतर भागात दंगलसदृश्य परिस्थिती होती. तर इतर भागात तणावपूर्ण शांतता होती. मोतीकारंजा भागात टपरीचा वाद होता त्यातुन हा प्रकार घडला, तसेच नळ कनेक्शन तोडल्याचा रोष होता हे कारणही हिंसक घटनांना कारणीभूत असू शकते. असे प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.
इंटरनेटसेवा केली खंडीत
सोशल नेटवर्कींग साईट असलेल्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपमुळे अफवा पसरत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी शनिवारी दुपारी एक पत्र काढुन शहरातील सर्वच मोबाईल कंपन्यांची इंटरनेटसेवा खंडीत केली. त्यामुळे नेहमी सोशल साईटवर असणार्‍यांची आणि अफवा पसरविणार्‍यांची गोची झाली होती.
तणाव वाढण्याची भीती
आजचे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस सतर्क आहेत.

लच्छू पैलवानवरून राजकारण केले जाणार

लच्छू पैलवान हा इथला दादा नगरसेवक शिवसेनेत होता. मात्र काही काळापूर्वी त्याने भाजपात प्रवेश केला. तो भाजपात फार दिवस राहिला नाही आणि शिवसेनेत परतला. त्याची पुतणी या भागात अपक्ष नगरसेविका आहे. या लच्छू पैलवानवर आरोप करून भाजपा आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More