काबूल विद्यापीठाजवळील आत्मघातकी हल्ल्यात 25 ठार ! 18 जखमी – eNavakal
News गुन्हे विदेश

काबूल विद्यापीठाजवळील आत्मघातकी हल्ल्यात 25 ठार ! 18 जखमी

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आज झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 25 जण ठार तर सुमारे 18 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या भीषण स्फोटानंतर परिसरात सगळीकडे मृतदेहांचा खच पडलेला दिसून येत होता. एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवल्याने मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली. गृहमंत्रालयाच्या मते, हा हल्लेखोर चालत आला होता. त्यानंतर त्याने काबूल विद्यापीठाजवळ स्वत:ला उडवले. हा स्फोट काबूल विद्यापीठ आणि अली अबद रूग्णालयादरम्यान झाला. सुरक्षादलांनी परिसर ताब्यात घेतला असून येथील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली होती. अद्याप या आत्मघातकी हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More