(अपडेट) ओएनजीसीच्या ७ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले; डहाणुजवळ समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष आढळले – eNavakal
अपघात महाराष्ट्र मुंबई

(अपडेट) ओएनजीसीच्या ७ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले; डहाणुजवळ समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष आढळले

मुंबई – जुहू विमानतळावरून सात कामगारांना घेऊन जाणारे बेपत्ता झालेले पवन हंसचे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती समोर येत आहे. डहाणूजवळ समुद्रामध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले आहेत.

सकाळी 10.30 च्या सुमारास एअर ट्राफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 7 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तब्बल साडे तीन तासांच्या शोधकार्यानंतर हे हेलिकॉप्टर डहाणूजवळ सापडलं आहे. डहाणूजवळ समुद्रामध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले आहेत. मुंबईपासून 30 एअरोनॉटिकल माईल अंतरावर या हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सकाळी साडेदहा वाजेपासून हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सात जणांचा शोध घेणे सध्या सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोकणातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी – दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याची शक्यता वर्तविली जात असल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसही सतर्क झाले असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवादी आदिलचा व्हिडिओ बनावट; पाकिस्तानी लष्कराच्या उलट्या बोंबा

रावळपिंडी – पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानची भूमिका मांडण्यासाठी आज तेथील लष्कराने पत्रकार परिषद घेतली. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हात वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

प्रथमच शरद पवारांच्या डोळ्यासमोर फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांत राडा

सातारा – लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील बंडाळी रोखण्यासाठी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवारांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने...
Read More