(अपडेट)मरीन ड्राईव्ह अपघात; महिला डॉक्टरचा मृत्यू – eNavakal
अपघात मुंबई

(अपडेट)मरीन ड्राईव्ह अपघात; महिला डॉक्टरचा मृत्यू

मुंबई – मरीन लाईन्सच्या तारापोरवाला मस्त्यालयाजवळ झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या दिपाली लाहामाटे या डॉक्टरचा  सहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर मृत्यू झाला आहे. २४ मार्च रोजी दिपाली आपल्या भावाच्या पदवीदान समारंभासाठी जात असताना नेपियन सी रोड येथे राहणाऱ्या शिखा झवेरी यांच्या गाडीने तिला धडक दिली.

रेड सिग्नल असतानाही झवेरी या गाडी न थांबवता पुढे निघून गेल्या. पण त्याचवेळी सर्तक असलेल्या एका बाईकस्वाराने पाठलाग करुन त्यांना गाडी थांबवायला भाग पाडली. मरीन लाईन्स पोलिसांनी शिखा झवेरीला अटक केल्यानंतर जामिनावर सोडून दिले. वैद्यकीयशास्रात  पदवी मिळवणारी दिपाली नायर रुग्णालयात इंटर्नशिप करत होती.  भावाच्या एमबीबीएसच्या पदवीदान समारंभाला जाताना हा अपघात घडला.  डॉक्टर झालो पण बहिणीला वाचवू शकलो नाही ही खंत नेहमी मनात राहील ही भावना व्यक्त करताना दिपालीच्या भावाला रडू अनावर झाले. दरम्यान आपल्या बहिणीचे अवयव दान करण्याचा निर्णय दिपालीच्या भावाने घेतला आहे.

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More
post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) नव्या गव्हर्नरांचा कस लागणार

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तीकांता दास यांची तातडीने निवड केली गेली. कारण पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची महत्वाची बैठक होणार आहे त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचा...
Read More