अपघातानंतर रिक्षाचालकाला चार जणांच्या टोळक्याची मारहाण! पुलावरून फेकण्याचा प्रयत्न – eNavakal
News महाराष्ट्र

अपघातानंतर रिक्षाचालकाला चार जणांच्या टोळक्याची मारहाण! पुलावरून फेकण्याचा प्रयत्न

रत्नागिरी – शहरानजीकच्या भाटे ब्रिज वर रिक्षा व दुचाकी यांच्यात अपघात होऊन अपघातानंतर रिक्षाचालकाला चार जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिकने बेदम मारहाण करून रिक्षाचालकाला पुलावरून खाली फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काहींनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान अपघातानंतर दुचाकीमधून दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्याने दारूची वाहतूक उघडकीस आल्यामुळे रिक्षा चालकाला मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.
घाटी येथून प्रवासी घेऊन निघालेल्या परेश अशोक शिवलकर (45) यांची रिक्षा भाटे ब्रिज वर आले असता समोरून एक्सेस दुचाकी घेऊन आलेला स्वार मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता त्यावेळी रिक्षा व दुचाकी यांच्यात समोरासमोर ठोकरून अपघात झाला. या अपघातानंतर दुचाकीतून दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या त्यावेळी रिक्षाचालकाने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला याचा राग येऊन दुचाकीस्वाराने आपल्या मोबाईल वरुन फोन करून काही तरुणांना बोलून घेतलं. अवघ्या काही क्षणातच चार तरुण हातात हॉकी स्टिक घेऊन भाटे ब्रिज वर दाखल झाले. संतप्त झालेल्या तरुणांनी मागचा पुढचा विचार न करता सुरुवातीला रीक्षाची तोडफोड केली आणि त्यानंतर रिक्षाचालक परेश शिवलकर यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली. दिवसाढवळ्या भाटे ब्रिज वर घडलेला अमानुष मारहाणीचा प्रकारानंतर त्या तरुणांनी रिक्षाचालक परेश शिरोडकर यांना पुलावरून पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रकार पाहून पुढे झालेल्या नागरिकांमुळे परेशचे प्राण वाचले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More