विरार – मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू झाला आहे. भामटपाडा-शिरसाड या मार्गावर रस्ता ओलंडत असताना मुंबईवरुन भरदाव वेगाने आलेल्या पिकअप टेंपोने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.
मुंबईवरुन अहमदाबादकडे जाताना भरदाव टेंपो क्रमांक MH.०४.EY.६३८६ या पिकअप टेंपोने रस्ता ओलंडत असतानाऱ्या संदेश महादेव दैवालकर ( वय 30 ) आणि सचिन महादेव दैवालकर ( वय 32 ) या दोघा सख्या भावांना धडक दिली आहे. हे दोघेही नालासोपारा येथे वास्तवास होते. यात संदेश हा अपंग आणि अंध व्यक्ती आहे.