अनेकांचा जिव वाचवून देवदूत ठरणाऱ्या रमेश खरमाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक  – eNavakal
News महाराष्ट्र

अनेकांचा जिव वाचवून देवदूत ठरणाऱ्या रमेश खरमाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक 

जुन्नर – भारतीय सैन्य दलात 17 वर्षे सेवा बजावत सेवा निवृत्ती नंतर देखील सामाजिक बांधिलकी जपत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना जीवदान देणारा जुन्नर तालुक्यातील देवदूतच ठरलेल्या माजी सैनिक रमेश गणपत खरमाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरमाळे यांनी  1995 मध्ये “मराठा लाईट इन्फैट्री” बेळगाव मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, अरूणाचल प्रदेश,हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये सेवा  केली. 17 वर्षे देशसेवा करून हवालदार रैंकमधुन2012 मध्ये रिटायरमेंट घेऊन रिटायरमेंटनंतर थेरगाव (पुणे) युनियन बॅकमध्ये 6 महीने नोकरी केली. 2013 साली जुन्नरमध्ये मुलांच्या करिअर करीता पोलीस,आर्मी, नेव्ही,एअरफोर्स आणि इतर नोकरी संदर्भाकरीता “शिवशक्ती अॅकाडमीची स्थापना केली. आदिवासी मुलांना फ्री पोलीस प्रशिक्षण सेवा देऊन अनेक अदिवासी मुले पोलीसमध्ये कार्यरत आहेत.
*माजी सैनिक रमेश गणपत खरमाळे यांनी केलेले समाजकार्य
माळशेजघाट एस टी दुर्घटनेत  – 27 मृतदेह काढण्यास मदत.
पुण्यातील 16 पर्यटक रात्री हडसर किल्यावर अडकले होते.
त्यांना काढण्यास महत्वाची मदत केली.
बेल्हे येथील 70 फुट खोल विहिरीतुन रात्री तीन मृतदेह बाहेर काढण्यात मदत.
पिंपळवंडी येथे मीनानदिला आलेल्या पुरातुन एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीला  जीवदान देण्यात महत्वाची भुमिका केली.
किल्ले जीवधनच्या बाजुला असलेल्या वानरलिंगीवरून दोनशेफुट दरीत पडलेल्या पर्यटकास सुरक्षित काढून जीवदान देण्यात महत्वाचे योगदान दिले.
किल्ले जीवधन उतरताना पडलेल्या पर्यटकाचा पाय फ्रॅक्चर झाला होता त्यास खाली आणण्यासाठी योगदान
2015 मध्ये वनविभाग जुन्नर मध्ये सेवेत रूजू. अनेक सर्पांना जीवदान देण्यात यश.
तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन तेथील ऐतिहासिक पाहाणी करुन इतरांन समोर मांडली जाते.
जिल्हय़ातील व बाहेरील येणार्या शालेय सहलींना मार्गदर्शन करणे.
तालुक्यातील काॅलेजेसमधील एन सी सी च्या विद्यार्थांना मार्गदर्शन.
आदिवासी शाळेत हाॅलिबाॅल प्रशिक्षण देणे.
जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास 10000 हजार विद्यार्थांना बिबट-मानव संघर्ष व बचाव मार्गदर्शनात प्रमुख सहभाग.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी  जुन्नर तालुक्यात रॅपलिंगचे आयोजन करून नाणेघाट मध्ये 350 फुट खोल एकाच दिवशी 45 पर्यटकांचे रॅपलिंग करून एक वेगळाच इतिहास घडविला.
किल्ले जिवधन जवळील 350 फुट उंचीचा वानरलिंगी सर करण्याचा तालुक्यात प्रथम मान मिळाला.
जुन्नर तालुक्याचा नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा जगासमोर नेहमी  उपलब्ध करून देणारा
राञी -अपराञी एखादी घटना घडली तर लगेच धावून जाणार्‍या, अनेकांचे प्राण वाचवून देवदूत ठरणाऱ्या खरमाळे यांचा अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी अनेकदा त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. कधीहि सत्काराची अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्याला शासन स्तरावर अद्यापदेखील त्यांना गौरविण्यात आले नाही अथवा त्यांच्या कार्याची दखल घेतली नसल्याची खंत त्यांच्या मिञ परिवारातून व्यक्त केली जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More