अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली असून या यादीत स्थान मिळविणारी अनुष्का ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे. उर्वरीत ४९ व्यक्ती व्यवसाय, राजकारण व साहित्य यांसारख्या विविध क्षेत्रातील आहेत. या यादीत अनुष्का ३९ व्या स्थानावर आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत.

अनुष्का ही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी म्हणून नेहमीच चर्चेत असते. शिवाय नीविया, एले १८, मिंत्रा डॉट कॉम यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांची ती ब्रँड अँबेसिडर आहे. बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ती केवळ बिग बजेट चित्रपटांमध्येच काम करते. तसेच अनुष्का इतर अभिनेत्रींच्या तुलनेने अधिक मानधन घेते, त्यामुळे तिला भारतातील सर्वात सामर्थ्यशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत स्थान देण्यात आले, असे फॉर्च्यून इंडियाने म्हटले आहे.

अनुष्का शर्माने २००८ साली ‘रब ने बनादी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अल्पावधीतच तिने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान पटकावले. अनुष्का विराटची पत्नी असल्याने आपल्या अभिनयासोबत ती सोशल मीडियावरही कायम चर्चेत असते. विराटसोबतचे तिचे बरेच फोटो व्हायरल होत असतात. अनुष्काने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. तिच्या निर्मितीखाली ‘एनएच १०’, ‘फिल्लोरी’, ‘परी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच अॅमेझॉन प्राईमसाठीदेखील ती एका वेबसीरिजची निर्मिती करत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्रात आज 6 हजार 555 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 6 हजार 555 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे – काल आणि आज मुंबईसह उपनगर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यानंतर आता कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण

शालेय शिक्षण विभागाकडून जिओ टीव्हीवरील तीन चॅनेलचे उद्घाटन

मुंबई – लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर जिओ टीव्ही प्लॅटफॉर्मवर इयत्ता बारावी विज्ञान शाखा,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

ऐका हो ऐका…’माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत जुनी शनाया परतणार

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लॉकडाऊननंतर आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. नव्या भागांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

गाझियाबाद – उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात एका मेणबत्तीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले...
Read More