अनुराग कश्यप म्हणतो मोदी नको, गडकरी हवेत – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

अनुराग कश्यप म्हणतो मोदी नको, गडकरी हवेत

मुंबई – 2014 साली संपूर्ण भारतावर गारूड केलेल्या मोदींची लोकप्रियता अवघ्या पाच वर्षांत घसरली आहे. सर्वच स्तरांतून त्यांना विरोध होत आहे. आता बॉलीवूडमध्येही विरोधाची लाट पसरली आहे. ‘ब्लॅक शेड्स’ या चित्रपटाचे विख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी तर पंतप्रधानपदासाठी मोदींपेक्षा नितीन गडकरी हेच योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे.
मोदींना गडकरी हे उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहेत. गडकरी हे स्वत: आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगत आहेत. परंतु भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सर्वांना मान्य असलेले नितीन गडकरी हेच पंतप्रधान बनू शकतात. भाजपाची जननी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघही गडकरींच्या बाजूचा आहे.
सर्व मित्रपक्षांना व प्रादेशिक पक्षांना नितीन गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार वाटतात. भाजपाकडून मोदींना पर्याय म्हणून गडकरी व सुषमा स्वराज आणि इतर दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत आहेत. मात्र हटके चित्रपटाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या अनुराग कश्यप याने पंतप्रधानपदासाठी मोदींऐवजी गडकरी यांना पसंती दिली आहे. तो म्हणतो, ‘सर्वच पक्षांत भ्रष्टाचार आहे. त्यातही गडकरी हे पंतप्रधानपदाला सर्वात योग्य आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More