अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने थेट पंतप्रधान मोदींनाच याबाबत सवाल केला आहे.

ट्विटरवर धमकी देणार्‍या या मोदी समर्थकाचे नाव रामसिंग असे असून त्याने आपल्या नावापुढे चौकीदार असा उल्‍लेख केला आहे. त्याच्या ट्विटमध्ये अश्‍लील भाषा वापरण्यात आली आहे. ‘तुझ्या बापाला शांत करायला सांग’ म्हणत या ट्विटमध्ये बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. या ट्विटवर अनुराग कश्यप यांनी ट्विव करत म्हटले आहे की, “प्रिय नरेंद्र मोदी सर, निवडणुकीतील विजयासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन! सर्वसमावेशक विकासाचा मुद्दा आपल्या भाषणातून मांडल्याबद्दल धन्यवाद! तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असल्याने तुमचे समर्थक माझ्या मुलीला अशाप्रकारे धमक्या देऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत. कृपया तुमच्या या अशा समर्थकांशी आम्ही कशाप्रकारे वागावे हेही तुम्ही आम्हाला सांगा.”
याआधी अनुरागने अनेकदा मोदींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. मात्र वैचारिक मतभेदासाठी माझ्या मुलीला अशाप्रकार धमकी दिल्याबद्दल अनुरागने चिंता व्यक्‍त केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More