अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज – eNavakal
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती आहेत. अनिल अंबानींवर एकूण 57,382 कोटींचे अर्ज आहे. भारतातीलच नव्हे तर चीनच्या बँकांचेही अब्जावधीचे कर्ज अनिल अंबानींच्या कंपनीवर आहे. चीनची सरकारी बँक असलेल्या चायना डेव्हलपमेंट बँकेचे अनिल अंबानींच्या रिलायन्स टेलिकॉम कंपनीवर 9,860 कोटींचे कर्ज आहे. एक्झिम बँक ऑफ चायनाचे 3,360 कोटींचे कर्ज आहे. तर इंडस्ट्रीयल कमर्शियल बँक ऑफ चायनाचे 1,554 कोटींचे कर्ज आहे.

भारतातील कंपनींना दिवाळखोर जाहीर करणार्‍या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे हे प्रकरण गेले आहे. तेेथे चीनच्या बँका आपली बाजू मांडत आहेत. कर्जबाजारी झालेल्या रिलायन्स टेलिकॉम कंपनीला मुकेश अंबानी यांनी 17,300 कोटी रुपयांना विकत घेण्याची तयारी दाखविली होती. मात्र टेलिकॉम नियंत्रक प्राधिकरणाच्या अडथळ्यामुळे हा खरेदी व्यवहार होऊ शकला नाही. तो व्यवहार झाला असता तर अनिल अंबानी यांच्या पाठीमागे लागलेला चीनच्या बँकांचा ससेमिरा कमी झाला असता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, राजकारण आमच्यासाठी धंदा नाही – संजय राऊत

मुंबई – ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात शब्दाला किंमत आहे. आमची वृत्ती व्यापारी नाही,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#HappyChildrensDay दारातून डोकावणारी ‘ती’ आज वर्गात बसून शिकतेय

हैदराबाद – असे म्हणतात की, ‘एक फोटो हा हजारो शब्दांसमान असतो.’ अशीच कमाल हैदराबादमधील एका छायाचित्रकाराने टिपलेल्या फोटोने केली आहे. दाराबाहेर उभी राहून वर्गात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संजय राऊत म्हणतात…’अब हारना और डरना मना है’

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली प्रचंड वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडून ‘पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच’, अशी घोषणा...
Read More