अनिल अंबानींच्या कंपन्यांनी 10,000 कोटी डुबविले – eNavakal
News मुंबई

अनिल अंबानींच्या कंपन्यांनी 10,000 कोटी डुबविले

मुंबई – अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला असून, त्यांच्या मालकीच्या दोन कंपन्यांनी विविध बँका आणि कंपन्यांचे किमान 10,000 कोटी रुपये डुबविल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे कंपनी कायदा न्यायाधिकरणाने त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू केली आहे. तर विजया बँकेने रिलायन्स नेव्हल अँड डिफेन्स इंजिनीअरिंगवर 9000 कोटींच्या थकबाकीची कारवाई सुरू केली आहे.
कधीकाळी टेलिफोन क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने आपले 1150 कोटीचे देणे डुबविल्याचा आरोप करीत स्वीडनच्या एरिक्सन कंपनीने त्याविरुद्ध दाखल केलेल्या तीन याचिका कंपनी कायदा न्यायधिकारणाने आज स्वीकारल्या आहेत. त्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या कंपनीवर चीन बँकेसह देशातील 31 बँकांचे 45,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. आज झालेल्या या घडामोडीमुळे कंपनीचे शेअर्स 15 % नी घसरले आहेत.
तसेच अनिल अंबानींच्या रिलायन्स नेव्हल अँड डिफेन्स इंजिनीअरिंग या कंपनीने सुद्धा आयडीबीआय बँकेच्या समूहातून 24 पेक्षा जास्त बँकांचे सुमारे 9,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यामध्ये बहुतांशी बँका या सरकारी बँका आहेत. दरम्यान कंपनी सुमारे 1000 कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. मार्चच्या तिमाहीत कंपनीकडून परतफेडीची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे आरबीआयच्या निर्देशानुसार विजया बँकेने कंपनीचे खाते एनपीएमध्ये वर्ग केले असून थकबाकीच्या वसुलीची पुढील कारवाई सुरु केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More