अनिल अंबानींचा राजीनामा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

अनिल अंबानींचा राजीनामा

नवी दिल्ली – अनिल धीरूभाई अंबानी यांनी कायद्याच्या तरतुदींचे पालन करत रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने शनिवारी यासंबंधी माहिती दिली. शेयर मार्केटला देण्यात आलेल्या माहितीमध्ये कंपनीने अंबानी यांनी कंपनी अॅक्ट 2013 च्या कलम 165 च्या तरतुदींनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे.

या तरतुदीनुसार एका वेळी एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये कंपनीचे संचालक म्हणून कोणीही राहू शकत नाही. रिलायन्स नेवल देशातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी आहे. या कंपनीकडे युद्धनौका व करार तयार करण्यासाठी परवाना आहे. 

अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेराल्डविरूद्ध ५ हजार करोड रूपयांच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे. नॅशनल हेराल्डमध्ये छापण्यात आलेल्या एका आर्टिकलमुळे हा खटला दाखल करण्यात आला आहे. या आर्टिकलमध्ये राफेल लढाऊ करार गैरव्यवहार असल्याचे म्हटले होते. नॅशनल हेराल्डने लिहिलेल्या आर्टिकलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी राफेल कराराची घोषणा करण्याच्या केवळ १० दिवस आधी अनिल अंबानींनी रिलायन्स डिफेन्सची सुरूवात केली असल्याचे म्हटले होते. या आर्टिकलमुळे जनतेमध्ये रिलायन्सची तसेच अनिल अंबानींची प्रतिमा खराब झाली असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More