अनंतनागमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान – eNavakal
दहशतवादी हल्ला देश

अनंतनागमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर – जम्मू कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान यश आले आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्थानी दहशतवादी असून दोन स्थानिक दहशतवादी आहेत. घटनास्थळावरून जवानांनी मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला असल्याची माहिती समोर येत आहे.

रविवारी मध्यरात्री २ वाजल्यापासून अनंतनाग जिल्ह्यातील हाकूरा गावात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. गस्तीवर असणाऱ्या जवान अनंतनाग जिल्ह्यातील हाकूरा गावामध्ये जात असताना दहशत दशतावाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी परिसराला घेरा घालत केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. चकमकीत ईसा फाजली, सईद ओवेस या स्थानिक दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यास यश आले असून एका दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही.

दरम्यान, सुरक्षेच्या खबरदारीसाठी आणि तणावपूर्ण परिस्थिती पाहत अनंतनाग जिल्ह्यामधील इंटरनेट सुविधा काही काळासाठी खंडित करण्यात आली आहे. तसेच या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्याने जवानांनी शोध मोहीम तीव्र केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी, भारताची मागणी मान्य

नवी दिल्ली – भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार भारतीय उच्चायोगाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मालाडनंतर फोर्टमध्येही इमारतीचा भाग कोसळला, अनेकजण दबल्याची शक्यता

मुंबई – मालाडच्या मालवणी परिसरात दुमजली इमारतीचा भाग कोसळल्यानंतर आता पुन्हा फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.या इमारतीचं पूनर्बांधणीचं काम सुरू असल्याची...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘ताईंनी केक आणला आणि साहेबांनी भरवला’, वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे बारामतीत

बारामती – सामाजिक न्यामंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर  मात केल्यानंतर आज पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठी केक आणला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात मुसळधार पाऊस, धरणं ३२ टक्के भरली, मुंबई-ठाणे-कोकणात हाहाकार

मुंबई – राज्यातील विविध भागात पावसाने आता चांगलाच जोर धरला असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जुलै महिन्यात राज्यातील मोठी धरणं ३६ टक्के भरली आहे. गेल्या...
Read More
post-image
मनोरंजन

इन्स्टाग्रामवर श्रद्धा कपूरचे ५० मिलिअन फॉलोवर्स, मराठीतून मानले आभार

श्रद्धा कपूरने नुकताच सोशल मीडियावर 50 मिलियन फॉलोवर्सचा आकडा पार केला असून आपल्या चाहत्यांना त्यांच्या या प्रेमासाठी धन्यवाद देताना आपल्या सोशल मीडियावर स्वहस्ताक्षरात तीन...
Read More