अदानीने विकत घेतली रिलायन्स वीज कंपनी 1452 कोटींची थकबाकी कोण अदा करणार? – eNavakal
देश

अदानीने विकत घेतली रिलायन्स वीज कंपनी 1452 कोटींची थकबाकी कोण अदा करणार?

मुबई- मेसर्स रिलायन्स एनर्जी या अनिल अंबानींच्या कंपनीने ग्राहकांकडून वापरलेल्या विजेच्या आकारावरती विद्युत शुल्क आणि वापरलेल्या युनिट वरील वीज कर ग्राहकांकडून वसूल करून शासनाच्या खात्यांमध्ये रु. 1452 कोटी रक्कम जमा केली नाही. गौतम अदानी यांनी रिलायन्स वीज कंपनी विकत घेतली असून, आता ही थकबाकी कोण अदा करणार? याबाबत अद्यापि कोणतीही स्पष्टता नाही. ऑक्टोबर 2016 ते ऑक्टोबर 2017 या 13 महिन्यांची 1451,69,15,200/- इतकी रक्कम थकविली असल्याची धक्कादायक माहिती शासनाच्या विद्युत निरीक्षकांनी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कळविली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे मेसर्स रिलायन्स एनर्जी कंपनीने विद्युत शुल्क आणि वीज करांची शिल्लक रक्कम बाबत माहिती विचारली होती. सांताक्रूझ निरीक्षण विभागाचे विद्युत निरीक्षक मिनाक्षी वाठोरे यांनी अनिल गलगली यांस कळविले की त्यांच्या कार्यालयामध्ये विद्युत करशाखा माहे जून 2017 पासून कार्यान्वित झाली आहे. जून 2017 या महिन्याची रु. 103,85,87,500/- रक्कम विद्युत शुल्क आणि रु. 14,14,58,200/- इतकी कर रक्कम हे 31 जुलै पर्यंत 2017 अदा केली नाही त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2017 या 4 महिन्यांची रु. 419,10,84,100/- इतकी रक्कम विद्युत शुल्क, रु. 43,14,99,900/- टॉस (0.15 पैसे ) आणि रु. 11,24,23,800/- ग्रीन सेस (0.08 पैसे) अशी एकूण रु. 473,50,07,800/- रक्कम अदा केली नाही. एकंदरीत जून 2017 ते ऑक्टोबर 2017 या 5 महिन्यांची 591,50,53,500/- इतकी रक्कम थकविली गेली आहे. मुंबई सेंट्रल येथील विद्युत निरीक्षक, मुंबई निरीक्षण विभागाने अनिल गलगली यांस कळविले की ऑक्टोबर 2016 ते मे 2017 या 8 महिन्यांची रु. 860,18,61,700/- इतकी रक्कम अदा केली नाही.
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून मेसर्स रिलायन्स एनर्जी कंपनीकडून विद्युत शुल्क आणि वीज करांची शिल्लक रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी केली आहे. तसेच रिलायन्स वीज कंपनीच्या बँकेच्या खात्याचे ऑडिट करून जोपर्यंत सर्व प्रकाराचे शुल्क आणि कर वसूल होत नाही तोपर्यंत रिलायन्स वीज कंपनीच्या विक्रीस मान्यता देऊ नये, अशी मागणी गलगली यांनी केली होती पण अजूनही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही उलट रिलायन्स कंपनीच्या अनिल अंबानी यांनी घाईघाईने अदाणी यांस वीज कंपनी विकून मोकळे सुद्धा झाले. आता 1452 कोटींची थकबाकीची रक्कम कोण अदा करणार आहे? यांचे स्पष्टीकरण अनिल अंबानी किंवा गौतम अदाणी यांसकडून महाराष्ट्र शासनाने घेत स्पष्टता करावी, अशी अनिल गलगली यांची मागणी आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More