अदनान सामींबाबत जाणून घेऊया… – eNavakal
मनोरंजन

अदनान सामींबाबत जाणून घेऊया…

अदनान सामींच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराला विरोध

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक-संगीतकार अदनान सामी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केला. मात्र त्यांच्या पद्मश्रीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध दर्शवला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी यासंदर्भात ट्विटद्वारे काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, ‘मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये,हे मनसे च ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?’

तसेच मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील अदनान यांना पद्मश्री पुरस्कार देण्यास विरोध केला. पाकिस्तानमधून येऊन कोणी जय मोदीचा नारा देत असेल तर त्याला भारताचे नागरिकत्व दिले जाते आणि त्याला पद्मश्री पुरस्कारही दिला जातो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली.

जाणून घेऊया अदनान सामींबाबत

अदनान सामी हे गायक आणि संगीतकार आहेत. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९६९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचे वडिल अरशद शामी खान हे पाकिस्तानी असून आई नौरीन खान या मूळच्या जम्मू-काश्मीरच्या रहिवासी होत्या. अरशद शामी खान यांनी १४ देशांमध्ये पाकिस्तानी राजदूत म्हणून काम केले. तर राजदूत होण्यापूर्वी ते पाकिस्तानच्या हवाई दलात सामील होते. अदनान सामी यांना 1 जानेवारी 2016 रोजी भारत सरकारकडून भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले.

तब्बल ३५ वाद्य वाजवता येतात

अदनान सामी यांनी लंडन विद्यापीठातून पत्रकारिता आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. तसेच लंडनच्या किंग महाविद्यालयातून त्यांनी वकिलीचे शिक्षणही घेतले होते. त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रशिक्षणाबाबत म्हणायचे झाले तर, अदनानी वयाच्या पाचव्या वर्षी पियानो वाजवायला शिकले. त्यांना एक किंवा दोन नाही, तर तब्बल ३५ वाद्य वाजवता येतात. पंडित शिवकुमार शर्मा हे त्यांचे गुरू. सुट्टीच्या दिवसांत लंडनहून भारतात आल्यावर अदनान पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडून संगीत शिकत असत.

आयुष्यात चार वेळा लग्न केलं

अदनान यांना आयुष्यात प्रचंड पैसा आणि समृद्धी मिळाली, मात्र आयुष्यभराचा साथीदार मिळविण्यासाठी त्यांना प्रचंड वाट पाहावी लागली. त्यांनी एकूण चारवेळा लग्न केलं. त्यांचं पाहिलं लग्न १९९३ साली अभिनेत्री जेबा बख्तियारशी झालं होतं. दोघांना एक मुलगा आहे ज्याचे नाव अजान असे आहे. त्याच्या जन्मानंतर काही काळाने अदनान आणि जेबाचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००१ साली अदनान यांनी पुन्हा लग्न केलं. अरब सबाशी त्यांनी निकाह केला. मात्र दीड वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. सबाने अदनान यांच्या जाडेपणामुळे त्यांना सोडले, असे म्हटले जाते. २००५ साली अदनान प्रचंड आजारी होते. तब्बल तीन वर्ष त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. याकाळात त्यांनी आपले १६७ किलो वजन कमी केले. हा त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. मात्र त्याहून धक्कादायक बाब म्हणजे अदनान यांचं वजन कमी झाल्यानंतर त्यांची दुसरी पत्नी सबाने पुन्हा त्यांच्याशी निकाह केला. मात्र यावेळीही त्यांची साथ फारकाळ टिकली नाही. तिसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतर अदनान यांनी २०१० साली जर्मनच्या रोया फरयाबीशी लग्न केलं.

कारकीर्द

१९८६ साली अदनान यांचं पहिलं इंग्रजी गाणं प्रदर्शित झालं होतं. ‘Run for His Life’ असं त्याचं नाव होतं. त्यानंतर त्यांनी ‘Talk to Me’, ‘Hot Summer Day’ आणि ‘You’re My Best Kept Secret’ अशी अनेक इंग्रजी गाणी गायली.

वयाच्या पाचव्या वर्षी पियानो वाजवायला शिकल्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा संगीताची रचना केली होती. आपण संगीत रचू शकतो हे त्यांनी त्यावेळीच ओळखले. त्यानंतर १९९५ साली ‘संग्राम’ या पाकिस्तानी चित्रपटातून अदनान यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला संगीतही त्यांनीच दिले होते. हा चित्रपट त्याकाळी ब्लॉकब्लास्टर ठरला. त्यानंतर २००० साली अदनान यांनी बॉलिवूडमध्ये ‘कभी तो नजर मिलाओ’ आणि ‘लिफ्ट करा दे’ ही गाणी लाँच केली. लिफ्ट करा दे या गाण्यात सुपरस्टार गोविंदा झळकला होता. त्यानंतर काय…अदनान यांना अनेक ऑफर्स मिळाल्या.

२००१ साली त्यांनी ‘अजनबी’ चित्रपटातील ‘तू सिर्फ मेरा महबूब’ गाणं रचलं. हे गाणं त्याकाळी सुपरहिट ठरलं. त्यानंतर अदनान मासिकांच्या कव्हरपेजवर झळकू लागले. २००२ साली त्यांचा ‘तेरा चेहरा’ हा अल्बम प्रदर्शित झाला. या अल्बमलाही प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली.

अदनान यांनी आपल्या बॉलिवूडच्या कारकिर्दीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह आशा भोसले, यश चोपडा, शाहरुख खान, सलमान खान अशा दिग्गजांसोबत काम केले. २०१० साली त्यांना पाकिस्तानच्या एका पुरस्कार सोहळ्यात पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More