अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर

बारामती – परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज मराठवाड्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पवार आज आणि उद्या मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा आणि उस्मानाबादमधील भागांना भेट देत झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. नुकतेच ते तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत.

राज्यात परतीच्या पावसामुळे कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात भातशेती आणि पिके तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. बारामती शहरातील विविध भागांना त्यांनी भेट दिली. यावेळी अधिक काटेकोरपणे उपाययोजना राबविण्याबाबत अजित पवारांनी सरकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

दरम्यान, राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका, प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी आणि पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. तसेच बाधितांना तातडीने मदत द्या आणि झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 61,871 नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 74,94,552 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर

बारामती – परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,791, पुण्यात 946 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,86,321 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. शनिवारी आढळलेल्या 10 हजार 259 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : धडाकेबाज दिल्लीचा चेन्नईवर दणदणीत विजय

शारजा – शिखर धवनचे धडाकेबाज शतक आणि अक्षर पटेलने अखेरच्या षटकांत फटकावलेल्या तीन षटकारांच्या जोरावर श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर...
Read More
post-image
News देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय यांचा जेडीयूत प्रवेश

लखनऊ- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रमेश उपाध्याय यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) या पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील जेडीयूचे अध्यक्ष अनूप...
Read More