सरकारच्या आश्वासनानंतर अण्णांचे उपोषण मागे – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

सरकारच्या आश्वासनानंतर अण्णांचे उपोषण मागे

अहमदनगर – जनलोकपाल कायद्याची अद्यापही अंमलबजावणी न झाल्याने आजपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धी मध्ये दाखल झाले होते. आंदोलनासंबंधी अण्णा हजारे यांच्या समवेत चर्चेची अंतिम फेरी झाली. गिरीष महाजन आणि आण्णा हजारे यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गिरीष महाजन यांनी अण्णांच्या सर्व मागण्यांचा आढावा घेतला असून अण्णांच्या सर्व मागण्या ९० टक्के पूर्ण झाल्या असल्याचे सांगितले आहे. सरकार अण्णांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अण्णांनी उपोषण थांबवावे अशी मागणी गिरीष महाजन यांनी यावेळी केली होती अखेर सरकारच्या आश्वासनानंतर अण्णांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. 

जनतेचे प्रश्न सुटणार नसतील तर आंदोलनाचा अधिकार घटनेने दिला असून जनतेच्या हितासाठी १९ आंदोलने केली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळत नाही, लोकपालबाबत मी आशावादी आहे परंतु, लोकपालबाबत साडेचार वर्ष वेळ का काढला असा सवाल अण्णांनी केला आहे. अनेक बाबतीत आशादायी चित्र आहे परंतु अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोग स्वायत्त करा, त्यांना स्वतंत्र्यपणे कारभार करु देण्याची मागणी त्यांनी केली आहे. लोकायुक्तालाही योग्य अधिकार मिळायला हवे, दुधाला खर्चावर आधारित भाव देण्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक प्रकियेत बदल करावे, ज्या लोकांना निवडणूकीसाठी उभा राहिलेला उमेदवार पसंत नसेल, जो भ्रष्ट, गुंड, लुटारू असेल त्याला मत द्यायचे नसेल तर तिथे ‘नापसंती’ असा पर्याय असावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. नापसंती या मतामुळे पुढील निवडणूकीसाठी त्या उमेदवाराला तिकीट देण्यात येणार नाही त्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More