अटक न करण्यासाठी लाचेची मागणी – eNavakal
गुन्हे मुंबई

अटक न करण्यासाठी लाचेची मागणी

मुंबई – गुन्ह्यांत अटकेची कारवाई टाळण्यासाठी 65 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन पंधरा हजार रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता घेताना एका हवालदाराला मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शरद जनार्दन निमसे असे या हवालदाराचे नाव असून ते सध्या नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो कार्यालयात कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी यातील तक्रारदाराने पोपटाच्या पिल्लांची एक जोडी विकत घेतली होती. त्याच्या विक्रीसाठी त्याने लोकेन्टो या वेबसाईटवर ऑनलाईन जाहिरात दिली होती. या जाहिरातीनंतर संबंधित अधिकार्‍यांनी तक्रारदाराला संपर्क साधून ते पोपटाच्या पिल्लांची ही जोडी विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. फोनवरुनच त्यांच्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यानंतर तक्रारदार ते पोपटांची पिल्ले घेऊन मुलुंडच्या डी मार्ट परिसरात आले होते. यावेळी तिथे आधीपासून पाळत ठेवलेल्या या अधिकार्‍यांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन नवी मुंबईतील कार्यालयात आणले होते. यावेळी त्यांना या गुन्ह्यांत अटक न करण्यासाठी शरद निमसे यांनी 65 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी 45 हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हवालदार शरद निमसे यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकार्‍यांनी शरद निमसे यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More