अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक ठार – eNavakal
अपघात महाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक ठार

सेलू – परभणी रस्त्यावरील जलशुध्दीकरण जवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकी चालकास धडक दिल्याने नांदेड येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेत वसमत जवळ निधन झाले. हि घटना २१ मार्चच्या रात्री ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास घडली असून मयतावर मुळ गावी निपाणी टाकळी येथे दि. २२ मार्च रोजी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील राजेभाऊ बापुराव चिंचाणे (वय ४२ वर्षे) हे आपल्या दुचाकी वरून सेलूहून गावाकडे जात असताना एका अज्ञात वाहणाने त्याना जलशुध्दीकरण परिसरा जवळ जोरात धडक दिल्याने दुचाकी वरून कोसळून गंभीर जखमी झाले. एका क्रुझर चालकाने त्याना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले परंतू प्रकृती गंभीर असल्याने लगेच परभणी व तेथून नांदेड येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेत वसमत जवळ रात्री १ च्या सुमारास निधन झाले. परभणी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यावर गुरुवारी निपाणी टाकळी येथे त्यांच्यावर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत राजेभाऊ चिंचाणे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,दोन मुलेअसा परिवार आहे.
अपघातात मयत झालेल्या राजेभाऊ चिंचाणे यांचा मुलगा प्रतिक चिंचाणे याची दहावीची परीक्षा सुरु आहे. घटनेच्या दिवशी गुरुवारी आयसीटीचा पेपर ११ ते १ या वेळात होता. घरी वडीलाचे प्रेत येण्याचे माहित असतांना सुध्दा प्रतिक चिंचाणे याने दहावीचा पेपर देण्याचे ठरविले. आणि हुंदके देत आयसीटीचा पेपर दिला. पेपर दिल्यानंतर गावाकडे निपाणी टाकळी येथे पोहचल्यावर वडील राजाभाऊ चिंचाणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. प्रतिकच्या धैर्याचे आणि अपघाती निधनामुळे गावकरी हळहळ व्यक्त करीत होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More