अजय गोगावलेच्या या गाण्याला मिळाले १०० मिलिअन व्ह्यूज – eNavakal
न्युज बुलेटिन मनोरंजन

अजय गोगावलेच्या या गाण्याला मिळाले १०० मिलिअन व्ह्यूज

ajay gogavle

मराठी – मराठी आणि बॉलिवडू संगीत विश्वात अधिराज्य गाजवणाऱ्या अजय गोगावलेच्या एका गाण्याला चक्क १०० मिलिअनपेक्षाही अधिक व्ह्युज मिळाले आहेत. त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली असून ती अनेक रसिकांच्या ओठावर नेहमीच तरळत असतात.

होणारा होतला जाणारा जातला मागे तू फिरू नको, 
उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा इसर गजाल कालची रे
देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे…
असे प्रेरणादायी शब्द आणि अतिशय श्रवणीय संगीत असलेल्या “देवाक काळजी रे” या “रेडू” चित्रपटातील गाण्यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गाण्याला यूट्यूबवर १०० मिलियन व्ह्यूज (१० कोटी) मिळाले असून, मराठी चित्रपट संगीतातील हा दुर्मिळ मान आहे.

नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा यांना ब्लिंक मोशन पिक्चर्सच्या सहयोगानं “रेडू” या चित्रपटाची निर्मिती केली. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल यांनी हा चित्रपट प्रस्तूत केला. सागर वंजारी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रतिष्ठेच्या अरविंदन पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकलेला हा चित्रपट १८ मे २०१८ रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच देवाक काळजी रे या गाण्यानं मराठीच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गीतकार गुरू ठाकूर यांनी हे गाणं लिहिलं आहे, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे.


“देवाक काळजी रे” या गाण्याला १०० मिलियन व्ह्यूज मिळणं अतिशय आनंददायी आहे. कोणत्याही गाण्याचा गायक हा चेहरा असतो. पण गीतकार, संगीतकार हे त्या गाण्याचं मन, शरीर, भाषा असं सारं काही असतात. कारण शब्द आणि संगीताचा विचार त्यांचा असतो. व्यावसायिक भाग म्हणून श्रेयगायकाला मिळत असलं, तरी या गाण्याच्या यशाचं खरं श्रेय गुरू ठाकूर आणि विजय गवंडे यांचं आहे. मी केवळ त्यातला एक भाग आहे. मला हे गाणं मनापासून आवडलं असल्यानं मीही त्यात जीव ओतला होता. आमच्या झिंगाट या गाण्याला ३०० मिलियनच्या आसपास व्ह्यूज आहेत. पण झिंगाट हे एक उडत्या चालीचं, धमाल गाणं होतं, तर देवाक काळजी रे हे गाणं भावनिक, हळवं आहे. त्यामुळे या गाण्याला १०० मिलियन व्ह्यूज मिळणं हा मराठी चित्रपट संगीतातला निश्चितपणे महत्त्वाचा टप्पा आणि मोठा मान आहे. माझ्याबरोबर अतुलनं हे गाणं ऐकलं, तेव्हाच त्यानं हे गाणं हिट होईल असं म्हटलं होतं. त्याचे शब्द सत्यात उतरले आहेत. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच हा आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. आपण या गाण्याचं यश साजरं केलं पाहिजे. या गाण्याला मिळालेल्या प्रतिसादातून मराठी प्रेक्षकांची संवेदनशीलता दिसते, असं गायक अजय गोगावले यांनी सांगितलं.

गीतकार गुरू ठाकूर गाण्याविषयी म्हणतात, की गीतकार, संगीतकार आणि गायक स्वतःचे १०० टक्के देऊन गाणं साकारतं. पण ते गाणं प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचं, रसिकांचं होऊन जातं. ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते गाणं आपलं वाटलं, तरच ते अजरामर होते. एखाद्या उडत्या चालीच्या गाण्याला अफाट प्रतिसाद मिळाला, तर समजू शकतो. पण अतिशय भावनिक गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद का मिळाला, याचं उत्तर गाण्याच्या युट्यबवरील व्हिडिओखालील कमेंट्समधून मिळतं. नैराश्यातून बाहेर आलो, जगण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळाली, अशा अनेक कमेंट्स तिथं आहेत. माझ्या शब्दांना विजय गवंडेने दिलेलं अप्रतिम संगीत, अजय गोगावलेचा दैवी आवाज आणि रेडू चित्रपटाची टीम या सर्वांचेच आभार मानावेेसे वाटतात. तसंच गाणं डोक्यावर घेणाऱ्या कोट्यवधी रसिकांना सलाम आहे.

#BablooBachelor सगळीकडे तेजश्री-शर्मनच्या किसिंगची चर्चा

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More