अचानक मागणी वाढल्यामुळे चलन तुटवडा – अरूण जेटलींचे ट्विट – eNavakal
अर्थ देश

अचानक मागणी वाढल्यामुळे चलन तुटवडा – अरूण जेटलींचे ट्विट

नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आसाम, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या अनेक शहरांमध्ये नोटाबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. देशात चलन तुटवडा नाही. बँकामध्येही कॅश आहे. फक्त काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्यामुळे रकमेचा तुटवडा जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जेटली ट्विटरवर म्हणाले, काही क्षेत्रात अचानक आणि असामान्य वृद्धि झाल्याने काही काळासाठी कॅशची कमतरता निर्माण झालीये. मात्र या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवड्याबाबत केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी आश्वासन दिले की लवकरच या समस्येवर तोडगा निघणार आहे. केंद्र सरकार आणि आरबीआयने एक समिती नेमलीये. ही समिती यावर लवकरच तोडगा काढेल. येत्या दोन ते तीन दिवसांत या परिस्थितीवर तोडगा निघेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळ्यात सेनेचे दोन महानगरप्रमुख तुरुंगात; महालेंना दिला डच्चू

धुळे – शिवसेनेतर्फे धुळ्यासाठी दोन महानगरप्रमुख पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख असलेले सतिश महाले भूसंपादन मोबदला हडपल्याप्रकरणी अमळनेरमध्ये दाखल गुन्ह्यात सध्या जळगाव कारागृहात...
Read More