अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावल्याने रविवारी सकाळी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने एक आदर्श व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात व्यक्त होत आहे.

गिरगावातील खाडिलकर रोड येथे दैनिक नवाकाळच्या कार्यालयात दुपारी १२ ते २ दरम्यान खाडीलकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. मरीन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक नवाकाळचे ज्येष्ठ संपादक नीळकंठ खाडिलकर यांनी त्यांच्या अग्रलेखातून अन्यायाविरूद्ध लिखाण केले. ते दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत. निळूभाऊ खाडिलकरांचे “हिंदुत्व” हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती प्रचंड गाजल्या. भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ ही नीलकंठ खाडिलकर यांची मराठी वाचकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीलकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी वापरली. खाडिलकरांच्या अग्रलेखांचे ५ हून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत.

त्यांना महाराष्ट्र सरकारचा पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार(२००८), भारत सरकारकडून पद्मश्री, ‘चौफेर’ कऱ्हाडतर्फे ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार, मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे पुरस्कार, इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोनवेळा अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. भाषिक वृत्तपत्र संघटना ‘आयएलएनए’चे ते चिटणीस होते.

  • .

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More