अखेर विवेकने ‘ते’ ट्विट केलं डिलीट, माफी मागितली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन मुंबई

अखेर विवेकने ‘ते’ ट्विट केलं डिलीट, माफी मागितली

मुंबई – लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा संपताच आलेल्या एक्झिट पोलबद्दल अभिनेता विवेक ओबेरॉयने केलेल्या टि्वटमुळे तो चांगलाच अडचणीत सापडला. एक्झिट पोलवरुन अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनवरील आक्षेपार्ह मीम ट्विटरवर पोस्ट केल्याप्रकरणी विवेक ओबेरॉयवर अनेकांनी टीकास्त्र डागलं आहे. याप्रकरणी एका महिलेचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्य तसेच केंद्रीय महिला आयोगाने याबाबत विवेक ओबेरॉयकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर आता विवेकने ‘ते’ ट्विट डिलीट करत माफी मागितली आहे.

ऐश्वर्याचा ‘तो’ फोटो ट्विट करून विवेक गोत्यात! केेंद्रीय महिला आयोगाने पाठवली नोटीस

विवेक ओबेरॉनने दोनवेळा ट्विट केले आहे. यातील पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कधी-कधी कोणाला पहिल्यांदा जे मजेशीर आणि निरपराध वाटते. ते दुसऱ्यांना बहुतेक वाटत नाही. मी गेली दहा वर्षे 2000 हून अधिक असहाय्य मुलींच्या सशक्तिकरणासाठी घालविली आहेत. मी कधीही कोणत्याही महिलेचा अपमान करण्यासंदर्भात विचार करु शकत नाही. त्यातनंर दुसऱ्या ट्विटमध्ये विवेक ओबेरॉयने लिहिले की, जर मीमला दिलेल्या रिप्लायवरुन एकाही महिलेला ठेच पोहचली असेल, तर यामध्ये सुधारणा गरजेची आहे. माफी मागतो. ट्विट डिलीट केले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा काल संपताच एक्झिट पोलनी एकच धमाल उडवून दिली आहे. एक्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नाही हे सांगणारे एक मीम्स तुफान व्हायरल झाले आहेत. या मीम्समध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे, त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम शेअर करताना विवेक ओबेरॉयने कॅप्शन देत लिहिले आहे की, ‘ही कलात्मकता आहे, यात राजकारण नाही… हेच आयुष्य…’. हे मीम पोस्ट केल्यानंतर नेटकर्‍यांच्या टीकेचा विवेक ओबेरॉयला सामना करावा लागला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More