अखेर मुंबईत मान्सूनपूर्व सरी बरसल्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

अखेर मुंबईत मान्सूनपूर्व सरी बरसल्या

मुंबई – मान्सून केरळात दाखल झाला असताना काल राज्यातही विविध ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या. मुंबईत काल रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. काही काळ का होईना पण या पावसाच्या सरींनी मुंबईकर सुखावले. मुंबईतील लालबाग, परळ, वरळीसह नवी मुंबईच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली. समुद्र किनारी आणि रात्री शतपावलीसाठी फिरणार्‍या पर्यटकांचा आनंद या पावसामुळे द्विगुणित झाला. उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवल्यानंतर शाळेत जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनाही पावसाचा आनंद लुटता आला. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे तोल जाऊन दुचाकीवरून पडल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्या. दरम्यान, काल दिवसभर राज्यात उन्हाचा पारा चढला होता. हा उन्हाचा कडाका मागील तीन वर्षांमधील सर्वाधिक असल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या सरींनी थोडा दिलासा दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More